Panchang 12 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अतिशय महत्त्व आहे. आज मार्गशीर्ष गुरुवारचं दुसरं व्रत आहे. आज घटस्थापना करुन वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं. पंचांगानुसार, मार्गशीर्ष पूजेचा शुभ मुहूर्त 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:09 ते दुपारी 12:49 पर्यंत असेल. यावेळी वैभव लक्ष्मी घटस्थापना आणि श्रीगणेशाच्या पूजेचा एकूण कालावधी 1 तास 40 मिनिटं असणार आहे.(Thursday Panchang )
पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून आज समसप्तक योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मेष राशीत आहे.
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे आज विष्णू अवतार श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाजान यांची पूजा केली जाणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.(Thursday panchang 12 december 2024 panchang in marathi margashirsha guruvar vrat)
वार - गुरुवार
तिथी - द्वादशी - 22:28:32 पर्यंत
नक्षत्र - अश्विनी - 09:53:20 पर्यंत
करण - भाव - 11:50:57 पर्यंत, बालव - 22:28:32 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - परिघ - 15:22:39 पर्यंत
सूर्योदय - 07:04:38
सूर्यास्त - 17:25:26
चंद्र रास - मेष
चंद्रोदय - 14:43:00
चंद्रास्त - 28:41:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:20:47
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
दुष्टमुहूर्त - 10:31:34 पासुन 11:12:58 पर्यंत, 14:39:54 पासुन 15:21:17 पर्यंत
कुलिक – 10:31:34 पासुन 11:12:58 पर्यंत
कंटक – 14:39:54 पासुन 15:21:17 पर्यंत
राहु काळ – 13:32:38 पासुन 14:50:14 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:02:40 पासुन 16:44:03 पर्यंत
यमघण्ट – 07:46:02 पासुन 08:27:25 पर्यंत
यमगण्ड - 07:04:38 पासुन 08:22:15 पर्यंत
गुलिक काळ – 09:39:50 पासुन 10:57:26 पर्यंत
अभिजीत - 11:54:21 पासुन 12:35:44 पर्यंत
दक्षिण
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)