आजचे राशीभविष्य | बुधवार | 23 जानेवारी 2019
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मदत मिळेल. आज खूप काम करावे लागेल पण घाबरून जाऊ नका. जोडीदाराकडून प्रेम आणि सुख मिळेल. धन लाभ होण्याचा योग आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणूक कराल. नवे दुकान खरेदी करायची इच्छा होईल. धार्मिक कामासाठी प्रवास होईल. चांगली संधी मिळेल. आरोग्यात सुधार होईल.
वृषभ : व्यवसाय ठिक चालेल. जुनै पैसे परत मिळतील. जमीनीच्या प्रकरणांत फायदा होण्याचे योग आहेत. जुने अडकलेले पैसे मिळण्याचा आज योग आहे. कर्जातून बाहेर येण्यासाठी मार्ग सापडेल. पैंशांशी काही प्रकरणात तुम्हाला मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. वडीलांकडून मदत मिळेल.
मिथून : खूप विचार मनात सुरू असल्याने कामात लक्ष लागणार नाही. खास प्रकरणांत निर्णय घेणे कठीण होईल. कामधंद्यात मन कमी असेल. कोणती ना कोणती चिंता वाटेल. कामात एकाग्रतना नसल्याने त्रस्त राहाल. विरोधक तुम्हाला त्रास देतील. नोकरीत बदलाचा योग आहे. खर्च देखील जास्त होईल. वायफळ खर्च वाढू शकतो. पोटाचे आजार आणि मानसिक तणावात राहाल.
कर्क : नशिब आणि वेळ तुमच्या बाजूने असतील. कोणत्या तरी कामात मोठा बदल होईल ज्यामुळे तुम्हाला फायदा मिळेल. जुनी कामे संपवून नवे काम सुरू करण्यास चांगली संधी मिळेल. जोखीम असलेल्या कामात यश मिळेल. जास्तीत जास्त वेळ मित्रांसोबत घालवाल. मित्रांची बरीचशी कामं तुमच्या मदतीनेच होतील.
सिंह : कामाच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी विरोधकांवर विजय मिळवाल. नवे काम मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि यश मिळेल. धन लाभ होऊ शकतो. आज तुम्ही विरोधकांवर भारी पडाल. केलेल्या कामांतून तुम्हाला धनलाभ होईल. मुलांकडून सुख आणि आर्थिक सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. पैसे आणि परिवाराशी संबंधित तुमचे विचार योग्य असतील.
कन्या : कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात धन लाभ होऊ शकतो. प्रेमी किंवा जोडीदार हीच तुमची मोठी ताकद असतील. कामकाज वाढू शकेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रेमात यश मिळाल्याने निराशा दूर होईल. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. तुम्हाला नव्या संधी मिळतील आणि येणाऱ्या दिवसांत प्रगती करण्यात यशस्वी व्हाल.
तुळ : तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि कामधंद्यात पूर्णपणे सावधान राहावे लागेल. जोडीदाराच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवलात तर दिवस चांगला राहील. दिवसभराच्या धावपळीने डोकेदुखी होऊ शकते. दमायला होईल. आराम करा. वेळ तुम्हाला पाहीजे तशी नसेल.
वृश्चिक : अडकलेला पैसा परत मिळेल. वरिष्ठ आज तुमच्या कामावर खूश असतील. कोणती तरी नवी जबाबदारी मिळू शकेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. प्रेमाचे आयुष्य छान जाईल. पैशांच्या स्थितीत सुधार होईल. रोजच्या कामात धन लाभ होऊ शकतो. जोडीदाराला तुमच्याकडून फायदा मिळेल. आवडत्या व्यक्तीशी ओळख होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करु नका.
धनु : कनिष्ठ वर्गाकडून मदत मिळाल्याने फायदा होईल. आज तुम्हाला एक नवी सुरूवात करण्याची संधी मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठ सर्व तुमची मदत करतील. कधी कोणाला मदत केली असाल तर ती व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊ शकते.आज तुम्ही प्रेमाच्या शोधात भावूक व्हाल. जोडीदाराला खुश करण्यासाठी खर्च कराल.
मकर : व्यवसायासाठी लहान आणि फायदेशीर प्रवासाचा योग आहे. नवी जबाबदारी आज मिळू शकते. नोकरीमध्ये फायदा होऊ शकतो. काही नव्या संधी मिळू शकतील. तुमच्या कामाचे कौतूक होऊ शकते. नवी जबाबदारी मिळू शकेल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. फिरायला जाल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : नोकरीमध्ये प्रदर्शन चांगले राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळेल. मुलाखत चांगली होईल. जुने मित्र तुम्हाला नोकरीसाठी मदत करतील. नोकरीतील तुमचे प्रदर्शन प्रभावी असेल. पैशांसाठी छोटा प्रवास करावा लागेल. मनोरंजनमध्ये वेळ जाईल. आरोग्याची काळजी घेईल.
मीन : काम करण्याच्या पद्धतीत थोडा बदल होईल. नोकरी आणि व्यवसायात लक्ष कमी असेल. काम कमी असेल आणि गोंधळ जास्त असेल. जोडीदाराशी भांडण होतील. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. बाचाबाची होईल. काही लोक तुमच्या कामाचे यश स्वत: कडे घेण्याचा प्रयत्न करतील. तुमची स्थिती सर्वांनाचा सांगायचा प्रयत्न करु नका. दिवस चांगला राहील.
-दीपक शुक्ला