Triple Rajyog : 500 वर्षांनंतर शुक्रादित्य अन् मालव्यसह 3 राजयोग! या लोकांचं नशिब चमकणार, आर्थिक लाभासह प्रगतीचे योग

Triple Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच तीन राजयोग शुक्रादित्य, बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे. याचा फायदा तीन राशीच्या लोकांना होणार असून त्यांना नशिबाची साथ मिळणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Mar 20, 2025, 04:23 PM IST
Triple Rajyog : 500 वर्षांनंतर शुक्रादित्य अन् मालव्यसह 3 राजयोग! या लोकांचं नशिब चमकणार, आर्थिक लाभासह प्रगतीचे योग

Triple Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी आपली स्थिती बदलतात. ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. अशात जेव्हा ग्रहांचं संक्रमण हे योग निर्माण करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात काही योग हे अतिशय शुभ असतात तर काही योग हे अतिशय घातक असतात. मार्च महिन्यात 5OO वर्षानंतर तीन राजयोग एकत्र निर्माण होत आहेत. सूर्य-शुक्र ग्रहाचा 'शुक्रादित्य राजयोग', सूर्य-बुध ग्रहाचा 'बुद्धादित्य राजयोग' आणि शुक्र-बुध ग्रहाचा 'लक्ष्मी नारायण राजयोग'. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू निघणार आहे. याशिवाय, या राशींना अचानक आर्थिक लाभासह प्रगतीची संधी मिळणार आहे. कोणत्या आहेत या नशिबवान राशी जाणून घेऊयात. 

मकर (Capricorn Zodiac)  

3  राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे. तसंच, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होणार आहे. यासोबतच, तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काही विशेष संधी मिळणार आहेत. त्याचबरोबर, व्यावसायिकांना व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि आर्थिक लाभ होणार आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे असून सामाजिक पातळीवर तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी तीन राजयोगांची निर्मिती अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तसंच, या काळात कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होणामर आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार असून नवीन स्रोतांकडून उत्पन्न मिळणार आहे. तसंच, यावेळी तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी प्राप्त होणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बंपर फायदे मिळणार आहे. गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. तसंच, तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होणार आहे. यावेळी तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. 

तूळ (Libra Zodiac) 

3 राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी पैशाच्या आवकासाठी नवीन मार्ग तयार होतील. यावेळी, व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात नफा मिळवण्याच्या संधी प्राप्त होणार आहे. नवीन प्रकल्पांवर काम केल्याने यश प्राप्त होणार आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील होणार आहे. या काळात, तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. तसंच, तुमचे काम पूर्ण होणार आहे. या काळात, तुम्ही वाहन किंवा मालमत्तेचा सौदा करू शकता. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)