)
हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये या दिवसाला खूप शुभ मानले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी देव-देवता गंगेत स्नान करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरतात. म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात, कारण असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून जगाला त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले.
बुधवारी, 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भूत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला सुपर मूनचे दर्शन घडणार आहे. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्याने त्याचे रूप अधिक मोठे, तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे.
सोमण यांनी सांगितले की, पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल तर त्याचे बिंब सामान्यपेक्षा अधिक मोठे व उजळ दिसते. तसेच सुंदर सुपर मून बुधवारी रात्री पाहायला मिळेल.
सामान्यतः चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किमी अंतरावर असतो. मात्र, या विशेष रात्री तो केवळ 3 लाख 56 हजार 834 किमी. अंतरावर येईल. त्यामुळे त्याचे बिंब आकाराने सुमारे 13 टक्के मोठे आणि 30 टक्के अधिक तेजस्वी असेल.
पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर त्याचे बिंब लहान आणि कमी उजळ दिसते, त्याला 'मायक्रो मून' म्हणतात. पण, बुधवारी दिसणारा सुपर मून हा त्याच्या नेमक्या उलट, तेजस्वी, भव्य आणि मोहक रुपात दिसेल."
हा सुपर मून सायंकाळी 5.44 वाजता पूर्वेकडे उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात झळकत राहील. यापुढील सुपर मून गुरुवार, 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या रात्री पाहायला मिळणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले.
हा सुपर मून सायंकाळी 5.44 वाजता पूर्वेकडे उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात झळकत राहील. यापुढील सुपर मून गुरुवार, 4 डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या रात्री पाहायला मिळणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. २०२५ मध्ये त्रिपुरारी पूर्णिमा सुपर मून का खास आहे?२०२५ मध्ये ५ नोव्हेंबरला होणारी त्रिपुरारी पूर्णिमा एक सुपर मून असेल. हा वर्षातील दुसरा सुपर मून आहे (ऑक्टोबर ७ नंतर), आणि तो वर्षातील सर्वात जवळचा सुपर मून ठरेल. यामुळे धार्मिक आणि खगोलीयदृष्ट्या हा दिवस अधिक विशेष होईल.
त्रिपुरारी पूर्णिमा म्हणजे काय?
त्रिपुरारी पूर्णिमा ही कार्तिक महिन्यातील पूर्णिमेचा दिवस आहे, जो भगवान शिवाला समर्पित असतो. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर (तीन राक्षसांचे राज्य) नष्ट केले, म्हणून याला त्रिपुरारी पूर्णिमा म्हणतात. ही दिवाळीचा देव दिवाळी (देव दीपावली) म्हणूनही ओळखली जाते.
2025 मध्ये त्रिपुरारी पूर्णिमा कधी आहे?
2025 मध्ये त्रिपुरारी पूर्णिमा ५ नोव्हेंबर, बुधवार रोजी साजरी होईल. पूर्णिमा तिथी 4 नोव्हेंबर रात्री 10.36 वाजता सुरू होईल आणि 5 नोव्हेंबर संध्याकाळी 5.11 वाजेपर्यंत चालू राहील.
सुपर मून म्हणजे काय?
सुपर मून ही पूर्णिमा आणि चंद्राची पृथ्वीशी सर्वात जवळची स्थिती (पेरिजी) एकत्र येणारी घटना आहे. यामुळे चंद्र मोठा आणि तेजस्वी दिसतो, जणू तो सामान्य पूर्णिमेपेक्षा 14% मोठा आणि 30% उजळ असतो.