Tuesday Panchang : मार्गशीर्ष मंगळवारी समसप्तक योग! गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

10 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार असून आज गणेशाची पूजा केली जाते. मग पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Dec 10, 2024, 01:18 AM IST
Tuesday Panchang : मार्गशीर्ष मंगळवारी समसप्तक योग! गणेशाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

Panchang 10 December 2024 in marathi : हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना अतिशय शुभ मानला जातो. आज मार्गशीर्ष महिन्यातील दशमी तिथी असून मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगातून समसप्तक योग निर्माण होतोय. 

Add Zee News as a Preferred Source

पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. आज  समसप्तक योगासह रवियोग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चंद्र मेष राशीत भ्रमण करतोय. (Tuesday Panchang )  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. मंगळवार हा दिवस हनुमान आणि गणेशाला समर्पित आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Tuesday panchang 10 december 2024 panchang in marathi  ) 

पंचांग खास मराठीत! (10 December 2024 panchang marathi)

वार - मंगळवार
तिथी - दशमी - 27:45:08 पर्यंत
नक्षत्र - उत्तराभाद्रपद - 13:31:09 पर्यंत
करण - तैतुल - 16:56:36 पर्यंत, गर - 27:45:08 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - व्यतापता - 22:02:30 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 07:03:17
सूर्यास्त - 17:24:53
चंद्र रास - मीन
चंद्रोदय - 13:31:00
चंद्रास्त - 26:25:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:21:35
महिना अमंत - मार्गशीर्ष
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 09:07:37 पासुन 09:49:03 पर्यंत
कुलिक – 13:16:15 पासुन 13:57:42 पर्यंत
कंटक – 07:44:44 पासुन 08:26:10 पर्यंत
राहु काळ – 14:49:29 पासुन 16:07:11 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:07:37 पासुन 09:49:03 पर्यंत
यमघण्ट – 10:30:30 पासुन 11:11:56 पर्यंत
यमगण्ड - 09:38:41 पासुन 10:56:23 पर्यंत
गुलिक काळ – 12:14:05 पासुन 13:31:47 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:53:22 पासुन 12:34:49 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More