मुंबई : घराच्या आत आणि बाहेर झाडं लावणे खूप चांगलं मानलं जातं. असं केल्याने घर फक्त हिरवंच दिसत नाही तर त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. घर सुंदर बनवण्यासाठी अनेकजण विविध झाडं लावतात. त्याचबरोबर या कामात अनेकजण वास्तुशास्त्राची मदत घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तूनुसार प्रत्येक रोपातून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत नाही, परंतु अशी अनेक झाडे आहेत, जी लावल्याने घरामध्ये दुःख आणि गरिबीचे आगमन सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती झाडे चुकूनही लावू नयेत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती 3 झाडं कोणती आहेत.


प्लम ट्री


गोड बेरी खायला सगळ्यांनाच आवडते. पण तुम्ही तुमच्या घरात किंवा जवळ कुठेही Plum Tree लावू नका. याचं कारण म्हणजे या झाडात काटे असतात आणि असं मानलं जातं की काटेरी झाड लावल्याने आयुष्यात अडथळेही वाढू लागतात. 


निवडूंग


निवडुंगाच्या झाडातही काटे असतात. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती या वनस्पतींचे काटे पाहते तेव्हा त्याला त्याच्या आयुष्यात काटे दिसू लागतात आणि तो निराश होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये निवडुंगाचं रोप लावल्याने कुटुंबात कलहाचे वातावरण वाढतं. त्यामुळे कुटुंबात आर्थिक संकट अधिक होऊन परस्पर मतभेद वाढू लागतात. 


लिंबू किंवा आवळ्याचं झाडं


लिंबाचं झाड आणि आवळा हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जाते. या दोन्ही गोष्टींचा आहारात समावेश करावा असं तज्ज्ञ म्हणतात. मात्र यासाठी ही दोन रोपं घरात किंवा बाहेर कधीही लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, लिंबू आणि करवंदाची चव आंबट असते, याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात गोडवा येण्याऐवजी आंबटपणा वाढू लागतो. परिणामी आपापसात तणाव पसरतो. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)