Weekly Tarot Horoscope : मालव्य राजयोगामुळे या लोकांची प्रगती आणि आर्थिक लाभ; पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 March 2025 in Marathi : या आठवड्यात शुक्र त्याच्या उच्च राशी मीन राशीत असून हा आठवडा मेष आणि कर्क राशीसह 4 राशींच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत, टॅरो कार्डच्या गणनेनुसार, आठवडा करिअरमध्ये प्रगती आणि यश घेऊन आळा आहे. एकंदरीत हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल पाहा टॅरो राशीभविष्य

नेहा चौधरी | Updated: Mar 17, 2025, 04:34 PM IST
Weekly Tarot Horoscope : मालव्य राजयोगामुळे या लोकांची प्रगती आणि आर्थिक लाभ; पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 17 to 23 March 2025 in Marathi : मार्चच्या या आठवड्यात मालव्य राजयोगाची निर्मिती झालीय. प्रत्यक्षात, शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये भ्रमण करत आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग निर्माण झालाय. परिस्थितीत टॅरो कार्ड्सची गणना सांगते की, या आठवड्यात मालव्य राजयोगाचा सर्वात फायदेशीर मेष, कर्क, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. सर्व राशींच्या लोकांसाठी आठवडा कसा जाईल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून  

मेष (Aries Zodiac)   

हा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी नवीन दिशेने वाटचाल करणारा ठरणार आहे. जुना प्रकल्प किंवा नातेसंबंध नवीन वळण घेणार आहे. आत्मविश्वास कायम ठेवा, कारण येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आशा आणि अपेक्षांनी भरलेला राहणारल आहे. जीवनात संतुलन राखणे महत्वाचे असणार आहे. शांत राहा आणि विचारपूर्वक निर्णय घेणं तुमच्यासाठी हिताच ठरेल. संबंध सुधारतील आणि नवीन सुरुवात होणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात स्थिरतेची आवश्यकता असणार आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार नक्की करा. धीर धरा आणि सध्याची परिस्थिती समजून घेऊन पुढे जा. जुन्या सवयी बदलण्याची हीच योग्य वेळ असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)

या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात गती येणार आहे. तुम्हाला करिअरशी संबंधित अनेक नवीन संधी मिळणार आहे. ज्यांचा फायदा घेणे महत्वाचे राहणार आहे. तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला आनंद आणि प्रेम मिळणार आहे. 

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलन राखण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेणारा असणार आहे. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्पष्टता राहणार आहे. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखा आणि कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नीट विचार करा. तुमची ऊर्जा सकारात्मक गोष्टींमध्ये वळवावी लागणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदलाचा असणार आहे. जुन्या गोष्टी सोडून द्या आणि नवीन कल्पना स्वीकारा. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला ताजेतवाने करणार आहात. जुन्या समस्या सुटणार असून एक नवीन दिशा तुम्हाला मिळणार आहे.

तूळ (Libra Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वावलंबनाचा असणार आहे. निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या विवेकाचे ऐकणं तुमच्या हिताच ठरणार आहे. योग्य मार्ग तुम्हाला स्वतःच दाखवेल. तुमचे शहाणपण नातेसंबंधांमध्येही उपयुक्त ठरणार आहे.

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्यांना नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे. कामात यश मिळेल. वैयक्तिक आयुष्यात आनंद आणि प्रेमाचे वातावरण असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहिला मिळतील. 

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन कल्पना आणि दिशा मिळणार आहे. जुन्या गोष्टी मागे ठेवा आणि नवीन दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. कोणताही जुना विचार किंवा सवय बदलून तुम्ही नवीन मार्गावर जाऊ शकता. धीर धरा आणि शहाणपणाने काम करणे हिताचे ठरणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयम आणि संतुलनाचा आहे. तुमच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये संतुलन राखा. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना योग्य वेळी निर्णय घ्या. तुमच्या कामात आणि नातेसंबंधात हुशार राहणार आहात. 

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा गोंधळात टाकणारा राहणार आहे. तुमचे विचार आणि भावना तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. मात्र घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. परिस्थिती स्पष्ट होण्यास वेळ लागणार आहे.

मीन  (Pisces Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंधांसाठी महत्त्वाचा राहणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना, तुमच्या हृदयाचे आणि मनाचे ऐका. तुमचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी वेळ तुम्हाला काढावा लागणार आहे. विचारपूर्वक निर्णय घेण्याची हीच वेळ असणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)