Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 october 2025 in Marathi : ऑक्टोबरच्या या आठवड्यात अतिशय शक्तिशाली असा शुक्रादित्य राजयोग असणार आहे. या आठवड्यात शुक्र कन्या राशीत भ्रमण करणार असून सूर्य आधीच कन्या राशीत विराजमान आहे. या दोघांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग प्रभावी राहणार आहे. टॅरो कार्डनुसार हा आठवडा सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली असणार आहे. या राशींना लक्षणीय नफा, आदर आणि उत्पन्न वाढ पाहिला मिळणार आहे. असा हा आठवडा टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या टॅरोकार्ड रिडर कविता ओझा यांच्याकडून
या राशीच्या लोकांना या आठवड्यात मानसिक अशांतता आणि तणावाचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक खर्च वाढणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून, तुमचे खर्च बरेच जास्त असणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळणार आहेत. जुन्या मित्रांना आणि हितचिंतकांना भेटल्याने मनःशांती प्राप्त होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडणार आहेत.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या आरोग्याबाबत खूप चिंतेचा राहणार आहे. व्यावसायिक योजना पूर्णपणे यशस्वी होणार नाहीत. निराश होऊ नका, कारण हा काळ तुमच्या संयम आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेणारा असणार आहे. तुमचे आरोग्य आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी योग आणि ध्यान करणे हिताचे ठरणार आहे. यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता येणार आहे.
या आठवड्यात मिथुन राशीसाठी मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक वाढीचा ठरणार आहे. धार्मिक किंवा बौद्धिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. व्यवसायातील भागीदारीमुळे फायदे होणार आहेत. तुमच्यासाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. तुमचे प्रेम जीवन गोड राहणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू किंवा आश्चर्याचा धक्का मिळणार आहे.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात मानसिक ताणतणावातून हळूहळू मुक्तता मिळणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे तुमच्या यशात एक महत्त्वाचा घटक असणार आहे. टीमवर्कमुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वैयक्तिक असंतोष किंवा निराशा अनुभवता येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला संयम बाळगावा लागणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने भरलेला राहणार आहे. तुमची ऊर्जा कामावर आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. आर्थिक स्थिरता स्थिर राहणार असून तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात घाई किंवा अति उत्साही होऊ नका. संयम आणि समजूतदारपणा तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे.
या राशीचे लोक या आठवड्यात विलासिता आणि भौतिक गोष्टींवर पैसे खर्च करणार आहे. असे केल्याने ते समाधानी राहणार आहे. तुमच्या बजेटकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहणार आहे. जुने वाद किंवा आरोग्य समस्या सुटणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत देखील प्रलंबित काम सोडवण्यास मदतगार ठरणार आहे.
या राशीचा आठवडा सर्जनशीलता आणि प्रेमाने भरलेला राहणार आहे. व्यवसाय किंवा करिअरमध्ये नवीन योजना सुरू करणार आहात. प्रेम जीवनाच्या बाबतीत, तुमचे नातेसंबंध मजबूत होणार आहेत. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. मित्र आणि कुटुंबासोबतचे मनोरंजनाचे क्षण तुम्हाला आनंद मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. ज्यामुळे मनःशांती आणि ओळख दोन्ही प्राप्त होणार आहे. मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये नवीन सुरुवात होणार आहे. पण, या आठवड्यात तुमचे काही काम उशिरा पूर्ण होणार आहे, म्हणून धीर सोडू नका.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामात अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तुमच्या कामाच्या मर्यादेतच तुमच्या योजना पूर्ण करणार आहेत. महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी कारण त्यांना हार्मोनल असंतुलनाचा अनुभव येणार आहे. योग, ध्यान आणि संतुलित आहार अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक दबावाचा सामना करावा लागणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावल्याने नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून संयम बाळगणे हिताचे ठरणार आहे. वैवाहिक जीवनात चढ-उतार येणार आहे. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता राहणार आहे. आठवड्याच्या मध्यात काही मोठ्या संधी आणि बदल दिसून येणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्वतःवर काम करण्यासाठी उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध राखणे तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक राहणार आहे. या आठवड्याच्या मध्यात तुमच्या करिअर आणि कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा पाहिला मिळणार आहे. तुमच्या चुकांमधून शिकल्याने तुम्हाला अधिक परिपूर्ण होण्यास मदत होणार आहे. आत्म-चिंतन आणि संयमाने, तुम्ही कठीण काळातही सहज मात करणार आहात.
या राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कठोर परिश्रम कामावर चांगले फळ देईल आणि कुटुंबाचा पाठिंबा स्थिरता प्रदान करणारा ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराशी भावनिक संबंध अधिक दृढ होणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.