हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी चालू होतो. जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो. हिंदूसाठी होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी कोकणात शिमगा हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घरी देव भेटायला येत असल्याचा विश्वास कोकणवासीयांचा आहे.
होलिका दहन या दिवशी नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला होता. विष्णूने नरसिंहचा अवतार घेऊन नकारात्मक विचारांचा वध केला. हा दिवस यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच होळीच्या दिवशी पूजा करण्यापूर्वी घरातून नारळ फिरवला जातो. या श्रीफळाच्या माध्यमातून घराची नजर काढली जाते.
होळी हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी श्रीफळाने घराची दृष्ट काढतो. घराची दृष्ट कशी काढतात या दिवशी घराच्या चारही कोपऱ्यातून श्रीफळ फिरवले जातो. तसेच घरातील महत्त्वाची ठिकाणं जसे की, स्वयंपाकघर, तिजोरी यासारख्या भागांपासून दृष्ट काढावी.
कुटुंबाची नजर काढताना म्हणायचे आहे की, माझ्या घराला जर कुणाची नजर लागली असेल तर ती दूर होऊ दे.
तसेच माझ्या घरातील माणसांना कुणाची दृष्ट लागली असेल तर ती दूर होऊ दे.
किंवा घरात जर कोणती निगेटिव्ह एनर्जी आली असेल तर ती घरातून बाहेर पडू दे म्हणून नारळ फिरवला जातो.
श्रीफळाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. हे श्रीफळ संपूर्ण घरात फिरवून नंतर आपल्या घराजवळील होळीमध्ये अर्पण करायचे आहे. होळी पेटत असेल तेव्हा हा नारळ जळत्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे.
हिंदू पंचांगानुसार, 13 मार्च 2025 ला रात्री 11.26 वाजल्यापासून ते रात्री 12.30 वाजेपर्यंत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी घरातून एक नारळ हातात धरुन शेंडीबाहेर असेल असाच हातात धरावा. तसेच, तो नारळ संपूर्ण घरात फिरवून होळीच्या दहनाच्या मुहूर्तावर अग्नीत अर्पण करावा.