घरच्या उंबऱ्यावर पाय ठेवून बाहेर का पडू नये? वास्तूशास्त्रात सांगितलंय कारण!

Vastu shastra Tips: वृंदावनचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित राधाकांत वत्स यांनी उंबरठ्यालावा पाय न लावण्याची कारणे सांगितली.

प्रविण दाभोळकर | Updated: Nov 6, 2025, 03:08 PM IST
घरच्या उंबऱ्यावर पाय ठेवून बाहेर का पडू नये? वास्तूशास्त्रात सांगितलंय कारण!
उंबरठा

Vastu shastra Tips: तुमच्या घराच्या दारातली ती छोटी लाकडी/दगडी पट्टी फक्त सजावट नाही तर ती ‘लक्ष्मी-स्थान’ आहे. वास्तु शास्त्र आणि ज्योतिषात उंबऱ्याला ‘देवद्वार’ मानलं जातं. वृंदावनचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित राधाकांत वत्स यांनी यामागची कारणे सांगितली. ज्यानंतर लाखो कुटुंबांनी हा नियम पाळायला सुरुवात केली.

Add Zee News as a Preferred Source

लक्ष्मी मातेच्या डोक्यावर पाय!

उंबरा म्हणजे माता लक्ष्मीचं सिंहासन. जेव्हा तुम्ही त्यावर पाय ठेवता, तेव्हा थेट मातेच्या मस्तकावर पाय ठेवल्यासारखं होतं. परिणामी घरातून पैसा, सुख, समृद्धी बाहेर पळते. 

उंबरा म्हणजे माता लक्ष्मीचं सिंहासन

जेव्हा तुम्ही त्यावर पाय ठेवता, तेव्हा थेट मातेच्या मस्तकावर पाय ठेवल्यासारखं होतं. परिणामी घरातून पैसा, सुख, समृद्धी बाहेर पळते. 

ऊर्जेची सुरक्षाकवच फाटतं!

वास्तुनुसार उंबरा हा ‘एनर्जी शील्ड’ आहे. तो घरातील शुभ ऊर्जा आत ठेवतो, अशुभ बाहेर. पाय ठेवल्याने हे कवच फाटतं. परिणामी घरात भांडण, आजार, अपयशाचा साखळी सुरू होते. 

पितृदोष जागा होतो!

उंबऱ्यावर जोरात पाय मारला की पूर्वज क्रोधित होतात. नाशिकच्या एका कुटुंबाला ९ वर्षे मुलगा बोलला नाही. उंबरा नियम पाळताच २८ व्या दिवशी बोलायला लागला! “हे विज्ञान नाही, शास्त्र आहे,” असे पंडित सांगतात.

राजवाड्यांचा 5000 वर्षांचा गुप्त नियम

महाराजांचे महालही उंबऱ्यावर पाय ठेवत नव्हते. ते नेहमी उजव्या पायाने उंबरा ओलांडायचे. जयपूरच्या राजघराण्यात आजही हा नियम पाळला जातो. ताज हॉटेलच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची मूर्ती आहे. त्यामुळे पाय ठेवणं बंदी!

11 सेकंदाचा उपाय, आयुष्यभर फायदा!  

रोज सकाळी उंबऱ्याला हळद-कुंकू लावा. बाहेर पडताना उजव्या पायाने उंबरा ओलांडा  “ॐ जय लक्ष्मी माते” म्हणत निघा.शुक्रवारी 11 फुले ठेवा, असा सल्ला देण्यात आलाय.

काय दिला सल्ला?

“जो उंबऱ्यावर पाय ठेवतो, तो स्वतःच्या नशिबाला लाथ मारतो!”  आजपासूनच नियम पाळा, लक्ष्मी माता तुमच्या दारात उभी आहे, फक्त पाय हटवा, असे पंडीत सांगतात.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More