Cricket Records: क्रिकेटच्या जगात काहीही अशक्य असं नाही. कधीही काहीही घडू शकता. परंतु काही रेकॉर्ड इतके दुर्मिळ असतात की तुम्ही त्यावर सहज विश्वास ठेवू शकत नाही. अलीकडेच असाच एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर झाला आहे. सचिन तेंडुलकरने 3 चेंडूत 24 धावा केल्या आणि तेही कोणताही नो बॉल किंवा वाईड बॉल न लावता. खरंतर चेंडूवर जास्तीत जास्त 6 धावा काढता येतात अशाप्रकारे म्हणून 3 चेंडूत जास्तीत जास्त 18 धावा काढता येतात. पण सचिन तेंडुलकरने 3 चेंडूत 24 धावा कशा केल्या, चला एक नजर टाकूयात.
सचिन तेंडुलकरने २००२ मध्ये भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान हा रेकॉर्ड केला होता. या एकदिवसीय सामन्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकरने खेळलेली खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जबरदस्त खेळींपैकी एक मानली जाते. सचिन स्वतः मानतो की ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी होती. हा एकदिवसीय सामना 4 डिसेंबर 2002 रोजी क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. या एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकरने 27 चेंडूत 72धावांची तुफानी खेळी केली. या काळात सचिनने 3 चेंडूत 24 धावा करत अप्रतिम कामगिरी केली.
हे ही वाचा: IPL 2025 च्या मधेच कर्णधार पॅट कमिन्सने सोडली SRH ची साथ? पत्नीच्या पोस्टमुळे उडाली खळबळ
क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेलेला हा एकदिवसीय सामना 10-10 षटकांच्या 4 डावांमध्ये विभागला गेला होता. भारत आणि न्यूझीलंड संघांना प्रत्येकी 10-10 षटकांच्या दोन डाव खेळाव्या लागल्या. दोन्ही संघांमध्ये 11 ऐवजी 12 खेळाडू खेळत होते. हा सामना आयसीसीच्या एका प्रयोगाचा भाग होता. या एकदिवसीय सामन्याला 'क्रिकेट मॅक्स इंटरनॅशनल' असे नाव देण्यात आले. या सामन्यात, गोलंदाजाच्या मागे असलेल्या साईट स्क्रीनसमोरील भागाला "मॅक्स झोन" घोषित करण्यात आले. या झोनमध्ये, शॉट मारणाऱ्या व्यक्तीला दुप्पट धावा मिळतील, म्हणजे जर कोणी चौकार मारला तर त्याला 4 ऐवजी 8 धावा मिळतील आणि जर त्याने षटकार मारला तर त्याला 6 ऐवजी 12 धावा मिळतील.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 10 षटकांत 5 गडी गमावून 123 धावा केल्या. भारताच्या डावात सलामीवीर म्हणून आलेल्या सचिन तेंडुलकर आणि त्याने काही क्षणातच क्राइस्टचर्चमध्ये वादळ निर्माण केले. सचिन तेंडुलकरने फक्त 27 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केली. सचिन तेंडुलकरने मॅक्स झोनमध्ये सलग तीन चेंडू मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. सचिनने या 3 चेंडूंवर एक चौकार, एक षटकार आणि 2 धावा केल्या, परंतु मॅक्स झोन नियमामुळे त्याच्या खात्यात 8, 12 आणि 4 धावा जमा झाल्या. अशाप्रकारे, तो सलग 3 चेंडूंवर 24 धावा करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे.