1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

Unique Cricket Records: 2 फलंदाजांनी फक्त एका चेंडूत 286 धावा केल्या असं म्हटलं तर ते एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही एक सत्य घटना आहे ज्याला क्रिकेटचे सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 16, 2025, 12:57 PM IST
1 चेंडूवर 286 धावा...! सामन्यामध्ये आणली बंदूक आणि कुऱ्हाड; क्रिकेटमधला सर्वात विचित्र सामना

Unbreakable Cricket Record: क्रिकेटच्या खेळात कधीही काहीही होऊ शकते. अगदी शेवटपर्यंत या सामन्यांमध्ये काय होईल याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही. यामध्ये अनेक विक्रमही होतात. 6 चेंडूत 6 षटकार किंवा एका षटकात 4 विकेट अशा विक्रमांवर विश्वास ठेवता येतो. पण दोन फलंदाजांनी केवळ एका चेंडूत 286 धावा केल्या असे म्हटल्यास हे एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटणार नाही. पण ही एक सत्य घटना आहे. होय तुम्ही नीट वाचलं, एका चेंडूवर 286 धावा केल्या आहेत.  हे क्रिकेटमधले सर्वात मोठे आश्चर्य म्हटले तर वावगे ठरणार नाही. 130 वर्षांपूर्वी घडलेल्या या पराक्रमावर आजही विश्वास ठेवणे कठीण आहे. एवढंच नाही तर सामन्याच्या दरम्यान बंदूक आणि कुऱ्हाड घ्यावी लागली होती. 

Add Zee News as a Preferred Source

हे ही वाचा: मुंबईच्या जवळच आहे मिनी थायलंड! दिवसातून फक्त 30 मिनिटेच उघडते; तुम्ही बघितले का?

 

2 फलंदाजांनी केली आश्चर्यकारक कामगिरी 

ही घटना 1894 साली वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच-XI या सामन्यात घडली होती. क्रिकेटच्या विश्वसनीय वेबसाइट ईएसपीएन क्रिकइन्फोनेही या विक्रमाची सविस्तर चर्चा केली आहे. रिपोर्टनुसार, एका वृत्तपत्रात या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. जेव्हा फक्त दोन फलंदाजांनी मिळून एका चेंडूवर 286 धावा केल्या. धावा मोजताना पंचांचाही गोंधळ उडाला होता. 

हे ही वाचा: Photo: 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा 2.5 लाख रुपयांना केला खरेदी, त्यापासूनच आता वर्षाला होतेय 1 कोटी रुपयांची कमाई

 

नक्की काय झालं?

व्हिक्टोरियाचा संघ फलंदाजी करत होता. संघाच्या एका फलंदाजाने शानदार शॉट खेळला आणि बॉल झाडाला लटकला. त्यानंतर फलंदाजांनी रन्स काढायला सुरू केली. चेंडू हरवल्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या संघाने पंचांना स्कोअरकार्ड थांबवण्याचे आवाहनही केले. पण फलंदाजांनी चेंडू दिसत असल्याचे सांगून अपील फेटाळले. फलंदाजांनी सुमारे 6 किमी धावून धावफलकावर 286 धावा केल्या.

हे ही वाचा: Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

 

बंदुक आणि कुऱ्हाड घेऊन आले मैदानात 

अहवालानुसार, फिल्डिंग करणाऱ्या संघाने चेंडू खाली येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण चेंडू खाली आला नाही, त्यानंतर  मैदानावर कुऱ्हाड आणण्यास सांगण्यात आले जेणेकरून त्याने झाड कापून चेंडू खाली घेता येऊ शकेल.पण कुऱ्हाड सापडली नाही, त्यानंतर रायफल मागवण्यात आली आणि चेंडूला लक्ष्य करून खाली पाडण्यात आले. तोपर्यंत फलंदाजांच्या 286 धावा झाल्या होत्या.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More