Cricket History : टीम इंडियानं सलग दुस-यांदा टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर विजयासाठी 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाने दिलेले 256 धावांचे टार्गेट पूरण करता करता न्यूझीलंडचा संघ 19 व्या ओव्हरला 159 धावांवर ऑलआउट झाला. अशातच क्रिकेचमधील 130 वर्ष जुना रेकॉर्ड चर्चेत आला आहे. एका खेळाडूने एका बॉलमध्ये 286 धावा काढल्या होत्या. क्रिकेटमधील जगातील एकमेव अशक्य विक्रम आजर्यंत कुणीच मोडला नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये एकदा घडले होते जेव्हा एका चेंडूत खेळाडूने 286 धावा काढल्या होत्या. एका चेंडूत जास्तीत जास्त 7 धावा काढता येवू शकतात. मात्र, 1894 मध्ये फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने खेळत होते. लंडनमधील "पाल-मॉल गॅझेट" या वृत्तपत्राने या सामन्यावर एक वृत्त प्रकाशित केले. त्यात असा दावा करण्यात आला होता की ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हन यांच्यात झालेल्या सामन्यात एका चेंडूत 286 धावा काढल्या गेल्या. या धावा थांबवण्यासाठी कुऱ्हाडी आणि बंदुकीचा वापर करण्यात आला, परंतु फलंदाज धावा काढत राहिले.
सामन्यादरम्यान, व्हिक्टोरियाच्या एका फलंदाजाने एक शक्तिशाली शॉट मारला आणि चेंडू सीमा रेषेच्या आत असलेल्या झाडावर पडला. जोपर्यंत चेंडू झाडावर अडकला तोपर्यंत फलंदाज धावत राहिला. विरोधी संघाच्या खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. त्यानंतर, काही विरोधी खेळाडू पंचांकडे गेले आणि त्याला धावा थांबवण्यास सांगितले. याचा काही उपयोग झाला नाही. पंचांनी फलंदाजांना धाव घेण्यापासून रोखले नाही. त्यांनी घोषित केले की चेंडू स्पष्ट दिसत होता आणि म्हणून तो हरवला असल्याचे घोषित करता येणार नाही.
मैदानावर एकाच वेळी दोन दृश्ये दिसत होती. फलंदाज खेळपट्टीवर धावत होते, तर दुसऱ्या संघाचे खेळाडू काठ्यांनी झाडांवरून चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू निघत नव्हता पंचांनी झाड तोडण्याचे आदेशही दिले. कुऱ्हाडी आणण्यात आल्या, पण इतक्या लवकर त्या कशा कापता येतील? शेवटी, चेंडू लक्ष्य करून झाडांवरून बाहेर काढण्यासाठी बंदुका मागवण्यात आल्या. चेंडू अखेर जमिनीवर पोहोचेपर्यंत व्हिक्टोरियाचे फलंदाजांनी 286 धावा काढल्या होत्या. त्या काळात क्रिकेटचे नियम खूप वेगळे होते. त्या काळात कमाल धावांची मर्यादा नव्हती. फलंदाज अनेकदा याचा फायदा घेत असत. आठ किंवा दहा धावा करणे आश्चर्यकारक नव्हते, परंतु 10 किंवा 20 धावा करणे दुर्मिळ होते.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
KKR
(20 ov) 180
|
VS |
GT
181/5(19.4 ov)
|
| Gujarat Titans beat Kolkata Knight Riders by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.