टी-20 वर्ल्ड कप पुन्हा वादात! पाकिस्तानी वंशाच्या चार खेळाडूंचा भारतीय Visa रद्द, एकाने भारताविरुद्ध केली वादग्रस्त पोस्ट

 T20 World Cup 2026 : मुस्तफिजूर रहमानला बाहेर केल्यावर बांगलादेश संघ भारतात सामने खेळवण्यासाठी आपल्या संघाला पाठवण्यास तयार नाही, तर आता अमेरिकेच्या पाकिस्तानी वंशाच्या चार खेळाडूंना भारताने व्हिसा नाकारला आहे.   

पूजा पवार | Updated: Jan 14, 2026, 03:51 PM IST
टी-20 वर्ल्ड कप पुन्हा वादात! पाकिस्तानी वंशाच्या चार खेळाडूंचा भारतीय Visa रद्द, एकाने भारताविरुद्ध केली वादग्रस्त पोस्ट
Photo Credit - Social Media

T20 World Cup 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा आयसीसी वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांना मिळालेला असून 7 फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून त्यांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. मात्र स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना टी-20 वर्ल्ड कप पुन्हा वादात अडकलाय. आयपीएलमधून बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजूर रहमानला बाहेर केल्यावर बांगलादेश संघ भारतात सामने खेळवण्यासाठी आपल्या संघाला पाठवण्यास तयार नाही, तर आता अमेरिकेच्या पाकिस्तानी वंशाच्या चार खेळाडूंना भारताने व्हिसा नाकारला आहे. यातील एका खेळाडूने भारताविरुद्ध वादग्रस्त पोस्ट सुद्धा केलीये. 

Add Zee News as a Preferred Source

पाकिस्तानी वंशाच्या चार खेळाडूंचा भारतीय Visa रद्द : 

मंगळवारी यूएसए संघातील एक पाकिस्तानी वंशाचा क्रिकेटर अली खान याने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करून त्याचा भारतीय व्हिसा रद्द झाल्यावर एक वादग्रस्त पोस्ट केली. अली खान ने टेलीकॉम एशिया स्पोर्टला एक व्हिडीओ मेसेज पाठवला यात त्याने म्हंटले की, 'हो, हे खरंय की तीन पाकिस्तानी मूळच्या खेळाडूंना भारतीय व्हिसा नाकारण्यात आलाय. म्हणजे ते यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत'. 

रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आलाय की टी20 वर्ल्ड कपसाठी 20 सदस्यांच्या यूएस संघात सामील असलेले तीन खेळाडू शायन जहांगीर, मोहम्मद मोहसिन आणि एहसान आदिल यांचा व्हिसा नाकारण्यात आलाय. या तिघांचा जन्म पाकिस्तानचा आहे मात्र आता हे तिघे यूएसएचे नागरिक आहेत. भारताच्या व्हिसा नियमांनुसार, पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सर्व लोकांना त्यांच्या जन्म देशाच्या पासपोर्टचा वापर करून व्हिसासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

यापूर्वी सुद्धा पाकिस्तानी मूळच्या खेळाडूंना भारतीय व्हिसा नाकारण्यात आल्याने अडचणींचा सामना करावा लागला होता. यापूर्वी सिकंदर जुल्फिकार आणि  साकिब जुल्फिकार यांना वर्ष 2019 मध्ये व्हिसा नाकारण्यात आला होता. तर सिराज अहमदला वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतात येण्यासाठी व्हिसा खूप उशिरा मिळाला होता. ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा (2017) आणि इंग्लंडचे फिरकीपटू रेहान अहमद आणि शोएब बशीर (2024) यांनाही या समस्यांचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा : पाकिस्तानी वंशाच्या क्रिकेटपटूचे घृणास्पद कृत्य, भारताचं नाव घेत टी20 वर्ल्ड कपपूर्वी केली 'ही' पोस्ट

 

अजून कोणत्या संघात पाकिस्तानी वंशाचे खेळाडू? 

यूएसए शिवाय यूएई, ओमान, नेपाल, कॅनडा, इंग्लंड आणि झिम्बाब्वे तसेच नेदरलँड या संघात सुद्धा पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. त्यामुळे या खेळाडूंना सुद्धा आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी अडचण येऊ शकते. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More