PSL 2026 मध्ये बाबर आझम सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी असला तरी, त्याला त्याचाच संघसहकारीकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात विकला न गेलेला खेळाडू, पाकिस्तानी टी20 लीगमध्ये स्फोटक फलंदाजी करत आहे.

Unsold Player kusal Mendis explosive batting in PSL 2026: सध्या क्रिकेट विश्वात सगळ्यात प्रसिद्ध अशी इंडियन प्रीमियम लीग अर्थात IPL सुरु आहे. जगभरातून या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू येतात त्यामुळे सगळ्याचं लक्ष या लीगकडे असते. पण याच वेळी एका खेळाडूने दुसऱ्या लीगमध्ये आपल्या दमदार खेळीने त्याच्याकडे लक्ष देण्यास भाग पाडले आहे. कुसल मेंडिसचा 2026 मधील इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात कोणत्याही संघाने न निवडल्यामुळे सुरुवातीला निराशा पत्करली होती. मात्र त्याने या गोष्टीला नकारात्मक न पाहता स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी म्हणून स्वीकारले आणि पाकिस्तान सुपर लीग मध्ये धडाकेबाज कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. पाकिस्तानी टी20 लीग (PSL 2026) मध्ये त्याने 541 धावा आणि 23 षटकार मारत मोठी खेळी केली. हा खेळाडू नेमका कोण आहे हे जाणून घेऊयात...
पीएसएलच्या या हंगामात त्याची फलंदाजी अत्यंत सातत्यपूर्ण आणि प्रभावी राहिली आहे. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक पद्धतीने खेळ करत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याच्या फटक्यांमध्ये आत्मविश्वास आणि अचूकता दोन्ही दिसून आली, ज्यामुळे तो प्रत्येक सामन्यात संघासाठी महत्त्वाचा ठरला.
बाबर आझम हा धावांच्या यादीत अव्वल असला तरी मेंडिसने त्याला खऱ्या अर्थाने कडवी टक्कर दिली आहे. दोघांमधील ही स्पर्धा चाहत्यांसाठी खूपच रोमांचक ठरली आहे. बाबरचा शांत आणि तांत्रिक खेळ आणि मेंडिसची आक्रमक शैली, या दोन भिन्न प्रकारच्या फलंदाजीमुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे.
मेंडिसच्या 51 धावा केवळ मोठ्या नाहीत, तर त्या निर्णायक क्षणी आलेल्या आहेत. अनेक सामन्यांत त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. त्याच्या खेळामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा परिणाम संघाच्या यशातही दिसून आला.
षटकारांच्या बाबतीत तर मेंडिसने आपली वेगळी छाप सोडली आहे. २३ षटकार ठोकत त्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. त्याचे लांबच लांब फटके आणि निर्भीड खेळ पाहून मैदानावरचा उत्साह दुप्पट झाला. साहिबजादा फरहान याच्याशी त्याची थेट स्पर्धा पाहायला मिळाली, तर उस्मान खान देखील जवळपासच राहिला. अंतिम सामन्यापूर्वीची परिस्थिती पाहता, मेंडिससमोर स्वतःचं नाव अधिक उंचावण्याची मोठी संधी आहे. जर त्याने अंतिम सामन्यात मोठी खेळी केली, तर तो केवळ धावांच्या यादीतच नाही तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वात प्रभावी खेळाडू म्हणूनही ओळखला जाऊ शकतो.
ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. आयपीएलमध्ये संधी न मिळाल्यानंतर अनेक खेळाडू निराश होतात, पण मेंडिसने त्याला सकारात्मक वळण दिलं. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडे पुन्हा मोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे. एकूणच, कुसल मेंडिसने या हंगामात दाखवून दिलं की, खरी क्षमता असेल तर संधी कुठेही मिळू शकते. त्याचा हा प्रवास अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा आहे. कारण अपयशानंतरही उभं राहून यश मिळवणं हाच खरा विजय आहे.