आधीच 27 कोटीचा खर्च त्यात दिग्वेशला रोज होणारा दंड... राठी अन् अभिषेकचा मैदानातच राडा, Video पाहून चाहत्यांचा संताप

Digvesh Rathi and Abhishek Sharma Fight:  दिग्वेश राठीच्या सेलिब्रेशन नंतर अभिषेक शर्मासोबत थेट लाईव्ह मॅचमध्ये शब्दांची जुगलबंदी रंगली. यावेळी पंत आणि अंपायरनी मध्यस्थीचा प्रयत्न करत हे भांडण सोडवलं.   

तेजश्री गायकवाड | Updated: May 20, 2025, 08:19 AM IST
आधीच 27 कोटीचा खर्च त्यात दिग्वेशला रोज होणारा दंड... राठी अन् अभिषेकचा मैदानातच राडा, Video पाहून चाहत्यांचा संताप
Abhishek Sharma and Digvesh Rathi big clash controversy after celebration

LSG vs SRH: लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात मोठा वाद निर्माण झाला. हैदराबादचा आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा आणि लखनऊचा फिरकीपटू दिग्वेश राठी यांच्यात लाईव्ह सामन्यात तणाव निर्माण झाला. लाईव्ह मॅचदरम्यान दोघांमध्ये शिवीगाळ झाली.  दोघांना शांत करण्यासाठी करण्यासाठी पंच आणि कर्णधार ऋषभ पंत यांना हस्तक्षेप करावा लागला. या भांडणाचे कारण दिग्वेश राठीचं नोटबुक सेलिब्रेशन ठरलं. राठीच्या या सेलिब्रेशवर आधीच दंड ठोठावला आहे.  

दिग्वेशचं नोटबुक सेलिब्रेशन ठरलं कारण

लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या 206 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा तुफानी बॅटिंग करत होता. अवघ्या 18 चेंडूत त्याने दमदार अर्धशतक झळकावले. या टप्प्यावर कर्णधार पंतने दिग्वेश राठीकडे ओव्हर सोपवली आणि त्याने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अभिषेकला बाद केलं. अभिषेकची विकेट घेताच नेहमीप्रमाणे राठीने आपल्या नोटबुक स्टाईलमध्ये सेलिब्रेट केलं ज्यामुळे वादाला सुरुवात झाली.

राठीचं सेलिब्रेशन आणि अभिषेक भडकला 

दिग्वेश राठी यापूर्वीही आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत राहिला आहे. BCCI ने त्याच्यावर या सेलिब्रेशनसाठी आधी दोन वेळा दंडही ठोठावला होता. मागच्या वेळेस त्याने प्रियांश आर्यच्या विकेटनंतर अशाचप्रकारे सेलिब्रेट केले होते आणि ते त्याला महागात पडले. मात्र यावेळी अभिषेक शर्मा पुढे आला आणि दिग्वेशच्या सेलिब्रेशनवर जोरदार आक्षेप घेतला. दिग्वेशने अभिषेककडे "बाहेर जा" असा इशारा करत सेलिब्रेट केलं, त्यानंतर अभिषेक परत वळला आणि दोघांमध्ये भर सामन्यात मैदानावर शाब्दिक बाचाबाची झाली. पंच आणि कर्णधार ऋषभ पंतने मध्ये येऊन वाद शांत केला.

 

सोशल मीडियावर चर्चा आणि टीका

या नव्या वादामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आहे. चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे की बीसीसीआय दिग्वेशवर पुन्हा कारवाई करू शकते, असा अंदाज लावला जात आहे. मात्र, वाद बाजूला ठेवला तर बाकी दिग्वेशची कामगिरी जबरदस्त ठरली. त्याने केवळ अभिषेकलाच नव्हे, तर नंतर ईशान किशनलाही बाद करत मोठा प्रभाव टाकला. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्याने तेच नोटबुक सेलिब्रेशन पुन्हा केलं.