)
Abhishek Sharma Exposes Shubman Gill: आशिया कप 2025 मध्ये एक नाव यावेळी प्रचंड चर्चेत आलं ते म्हणजे अभिषेक शर्मा. अभिषेक शर्माने यावेळी दमदार कामगिरी केली. आशिया कप 2025 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माने आता एक खुलासा केला आहे. त्याने आपल्या लहानपणीच्या मित्राबाबत एक मजेशीर किस्सा उघड केला आहे. टीम इंडिया टेस्ट कर्णधार शुभमन गिलसोबतचा हा किस्सा इतका गंमतीदार होता की, त्यावेळी अभिषेकला संघातून बाहेर जावं लागलं असतं असं अभिषेकने सांगितलं. चला नक्की काय झालं ते जाणून घेऊयात.
या स्पर्धेत अभिषेकने तब्बल 314 धावा ठोकत मॅन ऑफ द टूर्नामेंट किताब पटकावला. पहिल्यांदाच त्याला शुभमन गिलसोबत भारतासाठी सलामीला उतरण्याची संधी मिळाली आणि दोघांनी मिळून उत्तम सुरुवाती दिल्या. या कामगिरीमुळे तो चर्चेत असतानाच त्याचा एक जुना किस्सा समोर आला आहे.
‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये गौरव कपूरशी बोलताना अभिषेकने अंडर-16 दिवसांची आठवण सांगितली. धर्मशाल्यातील स्पर्धेत पंजाब, दिल्ली आणि हिमाचलचे खेळाडू होते. मैदान हॉटेलपासून फक्त 500 मीटर अंतरावर असूनही खेळाडूंना बसनेच न्यायचं ठरत असे. बस ड्रायव्हर गाणी वाजवण्यास नकार देत असे. तेव्हा अभिषेक, गिल आणि बाकी मित्र जोरात पंजाबी गाणी लावत. एकदा या प्रकाराने त्रस्त होऊन ड्रायव्हरने थेट प्रशिक्षकाकडे तक्रार केली. त्याने 4–5 मुलांना ओळखलं, ज्यात अभिषेक आणि प्रभसिमरन होते. गंमत म्हणजे गिलवर बोट ठेवलंच नाही. मग या मुलांना कोचने घर पाठवण्याची धमकी देत लेटरवर साइन करायला लावलं. अभिषेकने त्यावेळी नाराजी व्यक्त केली की, “हे सगळं गिलमुळे घडलं, मग त्याला का वाचवलं?”
अभिषेकने गिलच्या खास कौशल्याचं रहस्यही सांगितलं. त्याने म्हटलं की, “गिल चेहऱ्याचे हावभाव पटकन बदलण्यात मास्टर आहे. तो हसताना क्षणात गंभीर होऊ शकतो. अशी कला फार थोड्यांकडे असते. तो इतकं निरागस चेहरा करून उभा राहतो की कुणालाही त्याच्यावर संशय येत नाही.”
"Abhishek Sharma shares a mischievous story about Shubman Gill!" pic.twitter.com/hDhu9kPGdk
— GillTheWill (@GillTheWill77) October 2, 2025
सध्या टेस्ट संघाचं नेतृत्व करताना गिल उत्तम फॉर्ममध्ये आहे, मात्र अभिषेकच्या आठवणींमधून त्याचा बालपणीचा मस्तीखोर अवतारही चाहत्यांना समोर आला आहे.