खेळात पराभव झाल्यामुळे संतप्त कोचनं महिला बास्केटबॉल खेळाडूचे ओढले केस; VIDEO मुळे खळबळ

VIRAL VIDEO : पराभवासाठी खेळाडूनला ठरवलं जबाबदार; संपत्प कोचनं महिला बास्केटबॉलपटूचे ओढले केस

दिक्षा पाटील | Updated: Mar 24, 2025, 03:05 PM IST
खेळात पराभव झाल्यामुळे संतप्त कोचनं महिला बास्केटबॉल खेळाडूचे ओढले केस; VIDEO मुळे खळबळ
(Photo Credit : Social Media)

VIRAL VIDEO : आधीच्या काळात शालेय शिक्षक हे मुलांना छड्यांनी मारायचे आणि त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्यायचे किंवा त्यांनी मस्ती केल्यास त्यांना छडी मारायचे. पण आताचं हे चित्र संपूर्णपणे बदललं आहे आता शिक्षक हे मुलांना शिक्षा देऊ शकत नाही. ती दिल्यास अनेकदा पालकच तक्रार करताना दिसतात. मात्र, आता माध्यमिक शाळेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बास्केटबॉल कोचनं केलेलं कृत्य पाहिल्यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया...

अमेरिकेत मॅचनंतर एका महिला खेळाडूचे त्या कोचनं केस ओढले आणि तिच्यावर ओरडताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना नॉर्थविल हाय स्कूलचे कोच जिम जुलो आणि खेळाडू हेमी मुनरोशी संबंधीत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं खूप नाराज झाले आहेत. 

नेमकं काय झालं?

ही घटना न्यूयॉर्कच्या क्लास डी स्टेट चॅम्पियनशिपच्या मॅचनंतर झाली. नॉर्थविलच्या टीमला फ्रेजविलकडून 43-37नं पराभव स्वीकारावा लागला. व्हिडीओत हेली मुनरो बेन्चजवळ उदास उभी होती. तेव्हाच 81 वर्षांचे कोच जिम जुलो तिच्या जवळ आले. त्यांनी हेलीचे केस खेचले आणि तिला ओरडू लागले. हेली दूर जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण कोच तिथे थांबत नाही. एका दुसरी खेळाडू मध्ये येते आणि कोचला थांबवण्याचा प्रयत्न करते. आता हा व्हिडीओ पाहून लोकं तिची स्तुती करत आहेत जिनं हिंम्मत करून कोचच्या विरोधात उभी राहिली. 

शाळेनं घेतला मोठा निर्णय

नॉर्थविल सेंट्रल स्कूल डिस्ट्रिक्टनं कोच जिम जुलोला लगेच निलंबित केलं. त्यानंतर शाळेनं एक पत्रक जारी करत सांगितलं की आम्हाला मुलींच्या बास्केटबॉल टीमच्या कोचनं जी वागणूनक दिली त्यामुळे खूप चिंता वाटते. ही घटना क्लास डी न्यूयॉर्क स्टेट चॅम्पियनशिप मॅच दरम्यान झाली होती. आम्ही आमच्या कोचकडून चांगली वागणूक मिळेल ही अपेक्षा करतो. खेळ, भावना आणि खेळाडूंच्या सन्मानाची अपेक्षा करतो. जे झालं ते चुकींचं झालं.