‘जर तो फिट असता तर...’, शमीवर अगरकरांची थेट प्रतिक्रिया; सगळ्यांसमोर केला खुलासा

Ajit Agarkar’s Big Statement on Mohammed Shami: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. सातत्याने दुर्लक्षित राहिल्यानंतर, शमीने अलीकडेच निवडकर्त्यांना प्रश्न विचारला, ज्यामुळे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर  यांना उत्तर द्यावे लागले. आगरकरने स्पष्टपणे सांगितले की जर शमी तंदुरुस्त असता तर तो संघात असता.  

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 18, 2025, 10:25 AM IST
‘जर तो फिट असता तर...’, शमीवर अगरकरांची थेट प्रतिक्रिया; सगळ्यांसमोर केला खुलासा

Ajit Agarkar’s Big Statement on Mohammed Shami: भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या वनडे संघात त्याचं नाव नसल्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेतूनही त्याला वगळण्यात आलं होतं. यानंतर शमीने थेट निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले, आणि आता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर   यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे की, “शमी फिट असता, तर तो नक्कीच टीममध्ये असता.”

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले अजित आगरकर? 

अगरकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “मी शमीशी अनेक वेळा बोललो आहे. त्याने काही विधान केलं असेल तर ते आमच्यातील संवादाचा भाग आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की, जर तो फिट असता, तर आज संघात त्याची जागा निश्चित होती.”

हे हा वाचा: 2027 चा वर्ल्ड कप रोहित शर्मा खेळणार? स्वतः केलं स्पष्ट, म्हणाला "मी कुठेही..."

 

काही दिवसांपूर्वी काय म्हणालेला शमी? 

शमीने काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की, रणजी ट्रॉफीत बंगालकडून खेळणं हेच त्याच्या फिटनेसचं प्रमाण आहे आणि त्याबद्दल निवड समितीला स्पष्टीकरण देणं त्याचं काम नाही. मात्र अजित आगरकर  यांनी त्याच्या या विधानावर प्रत्युत्तर देत म्हटलं, “मला त्याने सोशल मीडियावर काय लिहिलंय हे माहित नाही, पण मी त्याच्याशी अनेकदा संपर्कात आहे. माझा फोन नेहमी खेळाडूंसाठी खुला असतो.”

हे ही वाचा: धक्कदायक! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू, सामन्यानंतर खेळाडू घरी परताना घडली घटना

अजित आगरकर पुढे म्हणाले, “शमी हा भारतासाठी अप्रतिम खेळाडू राहिला आहे. त्याच्या गुणवत्तेवर कुणीही प्रश्नचिन्ह लावू शकत नाही. पण इंग्लंड मालिकेपूर्वीही आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, जर तो फिट असता, तर तो त्या फ्लाइटमध्ये असता. दुर्दैवाने तसं झालं नाही.”

मुख्य निवडकर्त्यांनी महत्त्वाची गोष्ट 

मुख्य निवडकर्त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट उघड केली.  “ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आम्ही त्याला संघात घेण्यासाठी उत्सुक होतो, पण फिटनेस रिपोर्ट चांगला नव्हता. मागील काही महिन्यांपासून तो टाच आणि गुडघ्याच्या दुखापतींनी त्रस्त आहे. जर पुढील काही आठवड्यांत तो पूर्णपणे फिट झाला, तर परिस्थिती नक्की बदलू शकते.”

हे ही वाचा: Virat Kohli आणि Rohit Sharma 2027 वर्ल्ड कप खेळणार का? अजीत अगरकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “दोन वर्षांत, ते..."

अजित आगरकर  शेवटी म्हणाले, “घरेलू हंगाम नुकताच सुरू झाला आहे. रणजी सामन्यांच्या काही फेऱ्यांनंतर आम्हाला त्याची फिटनेस आणि फॉर्म दोन्ही कळतील. जर तो चांगली गोलंदाजी करत असेल, तर मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूला संघात परत आणायला आम्हाला काहीच हरकत नाही.”

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More