)
IND VS AUS : बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी २० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वनडे आणि टी २० फॉरमॅटमध्ये टीम इंडिया प्रत्येकी तीन सामने खेळणार आहे. सिलेक्शन कमिटीने वर्ल्ड कप 2027 लक्षात घेऊन शुभमन गिलला वनडे कर्णधार बनवलंय , त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसतील. दरम्यान चीफ सेलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. ज्यामुळे रोहित आणि विराटच्या फॅन्सना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
चीफ सेलेक्टर अजित आगरकरने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वर्ल्ड कप 2027 मध्ये भाग घेण्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. अजित आगरकरांनी स्पष्ट म्हटलं आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे वर्ल्ड कप 2027 खेळण्याबाबत नॉन कमिटेड आहेत. अजित आगरकरांच्या या वक्तव्यावरून अशी शंका उपस्थित केली जातेय की रोहित शर्मा आणि विराट कोहली वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळताना दिसणार नाहीत. भारताच्या कोट्यवधी क्रिकेट फॅन्ससाठी हा खूप मोठा धक्का असणार आहे. अजित आगरकरांनी याशिवाय सांगितलं की, विराट आणि रोहित यांना संदेश पाठवण्यात आलाय की ते जेव्हा रिकामे असतील किंवा आंतरराष्ट्रीय सामना खेळत नसतील तेव्हा त्यांनी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावेत.
अजित आगरकरने म्हटले की, 'आम्ही आधीच स्पष्ट केलं की जर खेळाडू रिकामे असतील तर त्यांनी देशांतार्गत क्रिकेट खेळावं'. अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टीम इंडियाचे नेतृत्व करत राहण्याचे समर्थन केले आहे. ड्रेसिंग रूममध्ये ते अजूनही लीडर आहेत असे ते म्हणाले. अजित आगरकर म्हणाले, 'ते (रोहित आणि विराट) गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे मार्गदर्शन करत आहेत. ते धावा करण्याचा प्रयत्न करत राहतात. ते अजूनही ड्रेसिंग रूममध्ये आघाडीवर आहेत. ते या फॉरमॅटमध्ये खूप यशस्वी झाले आहेत. ऑस्ट्रेलिया वनडे सीरिजसाठी या संघाची निवड झाली आहे, तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही'.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेला भारतीय संघ –
शुभमन गिल (कर्णधार)
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रेयस अय्यर (उपकर्णधार)
अक्षर पटेल
केएल राहुल (यष्टीरक्षक)
नीतीश कुमार रेड्डी
वाशिंगटन सुंदर
कुलदीप यादव
हर्षित राणा
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंह
प्रसिद्ध कृष्णा
ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
यशस्वी जायसवाल
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघरचना अशी आहे –
सूर्यकुमार यादव (कर्णधार)
अभिषेक शर्मा
शुभमन गिल (उपकर्णधार)
तिलक वर्मा
नीतीश कुमार रेड्डी
शिवम दुबे
अक्षर पटेल
जितेश शर्मा
वरुण चक्रवर्ती
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंह
कुलदीप यादव
हर्षित राणा
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
रिंकू सिंह
वाशिंगटन सुंदर
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोणत्या सीरिजची घोषणा केली आहे?
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 3 सामन्यांची ODI सीरिज (19 ऑक्टोबरपासून) आणि 5 सामन्यांची T20I सीरिज (29 ऑक्टोबरपासून) यासाठी संघांची घोषणा केली आहे.
ODI सीरिजसाठी भारताचा कर्णधार कोण आहे?
शुभमन गिल यांना ODI कर्णधार बनवण्यात आले आहे. हे वर्ल्ड कप 2027 लक्षात घेऊन घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहे.
ODI संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा समावेश आहे का?
होय, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा ODI संघात समावेश आहे. ते शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळतील. ते फक्त ODI फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करत आहेत, टेस्ट आणि T20I मधून निवृत्त झाले आहेत.