आकाश दीपने वाजवला इंग्लंड संघाचा बँड! पहिल्यांदाच घेतला पाच विकेट्स हॉल, टीमसोबत सेलिब्रेशनचा जल्लोष; पाहा VIDEO

Akash deep took 5 wickets: एजबेस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आकाश दीपने चेंडूने शानदार कामगिरी केली. त्याने पाच विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jul 6, 2025, 11:14 PM IST
आकाश दीपने वाजवला इंग्लंड संघाचा बँड! पहिल्यांदाच घेतला पाच विकेट्स हॉल, टीमसोबत सेलिब्रेशनचा जल्लोष; पाहा VIDEO

Akash deep wickets: इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबेस्टन येथे खेळवला गेला. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीत चमत्कार केले आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. एजबेस्टनच्या ऐतिहासिक टेस्टमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप लक्षवेधी ठरला. दुसऱ्या डावात त्याने धमाकेदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. त्याने पाच बळी घेत आकाशने इंग्लिश फलंदाजांचा कणाचा मोडला. त्याने टीम इंडियाला भक्कम विजयाच्या उंबरठ्यावर उभं केलं.

Add Zee News as a Preferred Source

सुवर्णसंधीचा घेतला पुरेपूर फायदा

या मालिकेत जसप्रीत बुमराह अनुपस्थित असल्यामुळे आकाश दीपला अंतिम संघात स्थान मिळालं. त्याने संधीचं सोनं करत त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. आपल्या वेगवान चेंडूंच्या माऱ्याने इंग्लंडला अक्षरशः बैकफूटवर ढकललं. पहिल्या डावात त्याने 4 बळी घेत सुरुवात केली आणि दुसऱ्या डावात तर भन्नाट खेळ करत आपल्या कारकिर्दीतील पहिलं पाच विकेट्स हॉल (5 wicket haul) साजरं केलं.

हे ही वाचा: IND vs ENG 2nd Test: आकाशदीपच्या एका जादुई चेंडूवर बोल्ड झाला जो रूट, पाहा धमाकेदार Video

जल्लोषाचा सोशल मीडियावर व्हायरल VIDEO

दुसऱ्या डावात त्याने बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हैरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांना पॅव्हेलियन दाखवत इंग्लंडचा टॉप ऑर्डर उध्वस्त केला. यानंतर मैदानावर खेळाडूंसोबत जो जल्लोष झाला, तो क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आकाश दीपच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि टीमसोबतचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता.

 

हे ही वाचा: IND vs ENG: 'Gill' Done India... भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय; मालिका 1-1 च्या बरोबरीत

 

कारकिर्दीतील आठवा टेस्ट, पहिल्याच इंग्लंड दौरा आणि दमदार छाप

हा सामना आकाश दीपच्या टेस्ट कारकिर्दीतील केवळ आठवा सामना होता. आत्तापर्यंत त्यांनी 14 डावांत एकूण 24 विकेट्स घेतल्या असून, त्यांचा बॉलिंग ऍव्हरेज 29.04 आणि इकॉनॉमी 3.75 इतकी आहे. त्याने दमदार कामगिरी करत त्याच्या खेळाचीही छाप सोडली आहे.  विशेष म्हणजे, हा इंग्लंडमधील त्यांचा पहिलाच टेस्ट सामना होता, आणि त्यात त्यांनी असा खेळ केला की, सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत.

हे ही वाचा: जिथे धोनी- विराट फेल तिथे गिलने दाखवला गेम! त्या मैदानावर शुभमन गिलनं दिला इंग्लंडला झटका; रचला ऐतिहासिक विक्रम

 

लॉर्ड्समध्ये मिळणार का संधी?

आता प्रश्न असा आहे की, एजबेस्टनमधील विजयानंतर टीम मॅनेजमेंट त्यांना लॉर्ड्स टेस्टमध्ये सलग संधी देईल का? त्यांच्या फॉर्म आणि आत्मविश्वास पाहता, हे जवळपास निश्चितच वाटत आहे. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More