'तो सर्वात जास्त आनंदी..'अमित शहांनी विनोद कांबळीबद्दल केला मोठा खुलासा

Amit Shah On Vinod Kambli:  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतची एक आठवण सांगितली आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 9, 2024, 03:44 PM IST
'तो सर्वात जास्त आनंदी..'अमित शहांनी विनोद कांबळीबद्दल केला मोठा खुलासा
विनोद कांबळी

Amit Shah On Vinod Kambli: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज विनोद कांबळी यांच्या भेटीचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. यामध्ये विनोद कांबळी खूपच खंगलेल्या अवस्थेत दिसतोय. विनोद कांबळी सध्या बॅड पॅचमधून जातोय. त्यासाठी 1982 ची क्रिकेट बॅच पुढे सरसावली आहे. विनोदवर अशी वेळ यायला नको होती, अशा भावना क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत. सोशल मीडियात प्रत्येकजण विनोद कांबळीच्या तडाखेबाज फलंदादीच्या आठवणी शेअर करत आहेत. या दरम्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील विनोद कांबळीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळीकडे सचिन तेंडुलकरप्रमाणे पैसा आणि प्रसिद्धी होती. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता विनोद कांबळीला शरीरही साथ देत नाहीय. त्याच्याकडे चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसेही नाहीयत. त्याला आजारांनीही घेरलंय. आता विनोद कांबळीचा उदरनिर्वाह बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद कांबळीसोबतची एक आठवण सांगितली आहे. 

विनोद कांबळीबद्दल काय म्हणाले अमित शहा?

चेन्नईत एका क्रिकेट कार्यक्रमादरम्यान विनोद कांबळी मला भेटला होता. तेव्हापर्यंत तो निवृत्त झाला होता. पण एक जमान्यात तो खूप चांगला बॅट्समन होता. मी त्याला विचारले, 'तुमच्या आयुष्यात अनेक उतार-चढाव आले. पण तुम्ही सर्वात आनंदी कधी होतात?' विनोदने मला सांगितले, 'सर, मी बड्या खेळाडुंना हैराण केलंय. आम्ही जिंकले आणि खूप रेकॉर्ड तोडले. पण आजदेखील मी सर्वात खूश तेव्हा असतो, जेव्हा एखाद्या युवा खेळाडुला बॅकफूटवर खेळायला शिकवतो.'

विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय पातळीवर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. भारतासाठी 100 हून अधिक वनडे खेळल्या आहेत. सचिन तेंडुलकरचा तो बालपणीचा मित्र आहे. एकेकाळी दोघांची मैत्री खूप चर्चेत असायची. पण एकिकडे सचिन क्रिकेटचा देव बनला. तर दुसरीकडे विनोद कांबळी वेदनादायी आयुष्य जगतोय.  या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी विनोद कांबळीसोबतच्या मुलाखतीची आठवण सांगितली. 

कांबळीने 104 वनडे आणि 17 टेस्ट खेळल्या 

विनोद कांबळीने भारतासाठी 104 वनडे आणि 17 टेस्ट मॅच खेळल्या आहे. त्याने आपली अखेरची टेस्ट 1995 मध्ये खेळली होती. तर 2000 साली 50 ओव्हरचा फॉर्मॅट खेळायला उतरला होता.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More