Fans angry after messi leaves stadium after 10 min walk around stadium poor management: लिओनेल मेस्सी भारतात 14 वर्षांनी आला आहे. त्याचा पहिला थांबा हा कोलकत्तामध्ये होता. कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर त्याचा कार्यक्रम झाला. पण या कार्क्रमाला वेगळंच वळण लागलं. प्रेक्षकांनी तिथे केलेल्या गोंधळामुळे मोठा हंगामा झाला.मेस्सी भारत दौऱ्यावर असून, कोलकात्यात या दौऱ्याची सुरुवात केली होती. कोलकाता विमानतळावर रात्रीपासूनच प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती, कारण लोक मेस्सीला पाहण्यासाठी आतुर होते. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये देखील मेसीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आणि इथे प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. लाखो, हजारो रुपयांची तिकीट काढून त्याचे चाहते त्याला बघायला आले होते. मेस्सी मैदानात तर आला पण त्यानंतर जे घडलं ते फारच वादग्रस्त ठरलं.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर, स्टेडियममधील प्रेक्षक नाराज होऊन गोंधळ घालू लागले. काही प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या आणि स्टेडियममधील खुर्च्या फेकायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं होतं की, त्यांनी 45 हजार रुपये खर्च करून कार्यक्रमासाठी तिकीट घेतले होते, पण त्यांना मेसीची एक झलकही पाहता आली नाही.
Pathetic. Woeful. Poignant.
Poor Organised event in Kolkata. Management played with fans emotion.#Messi #MessiInIndia #Messi #MessiKolkata pic.twitter.com/efrSb7Nwxu
— Jaikumar Murugesan (@ChoChoJaikul) December 13, 2025
चिडलेल्या एका फॅनने एएनआयला सांगितलं की, "हा इव्हेंट एकदम बकवास होता. मेसी फक्त 10 मिनिटं इथे आला, आणि त्याला नेता लोकांनी घेरून ठेवले. आम्ही त्याला पाहूच शकले नाही. त्याने मैदानावर एकही शॉट घेतला नाही, न पेनल्टी घेतली. इतके पैसे आणि भावनांची बर्बादी झाली."
Chaos erupted at Kolkata’s Salt Lake Stadium as angry fans hurled bottles and chairs from the stands. Legendary footballer Lionel Messi has left the stadium. More details are awaited
Source: ANI#LionelMessi #Messi #MessiInIndia #Kolkata pic.twitter.com/SfedNuIJTp
— WION (@WIONews) December 13, 2025
प्रेक्षकांनी रागात येऊन खुर्च्या मैदानात फेकून दिल्या. त्याचवेळी सैकडो लोक सुरक्षा बैरिकेड्स तोडून मैदानात घुसले. पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण प्रेक्षकांचे नियंत्रण घेण्यात ते अयशस्वी ठरले. याबद्दल कंप्रोमाइज करत, मेसीला सुरक्षा कारणास्तव कार्यक्रम आधीच थांबवून स्टेडियममधून बाहेर नेलं. त्यानंतर, मुख्यमंत्री ममता बनर्जी देखील कार्यक्रमादरम्यान परत गेल्या.
#WATCH | Kolkata, West Bengal: A fan of star footballer Lionel Messi says, "Absolutely terrible event. He came for just 10 minutes. All the leaders and ministers surrounded him. We couldn't see anything. He didn't take a single kick or a single penalty. They said they would bring… https://t.co/Ce4kNu8dBH pic.twitter.com/Rpko4UwlLW
— ANI (@ANI) December 13, 2025
फॅन्सचा आरोप होता की, मेसीला घेरून ठेवलेल्या 100 लोकांमुळे ते त्याला पाहू शकले नाहीत. काहींनी म्हणलं की, खेळमंत्री अरूप बिस्वास आणि इतर वीआयपी लोक सेल्फी घेण्यात व्यस्त होते, त्यामुळे मेसीला पाहणारे प्रेक्षक दुरावले. त्याचप्रमाणे, खेळमंत्र्यांनी आपले लोकच स्टेडियममध्ये भरले होते, असं आरोप करण्यात आलं.
Kolkata, West Bengal: Angry fans vandalise the Salt Lake Stadium in Kolkata, alleging poor management of the event
A fan of star footballer Lionel Messi said, "Absolutely terrible event. He came for just 10 minutes. All the leaders and ministers surrounded him. We couldn't see… pic.twitter.com/a3RsbEFmTi
— ANI (@ANI) December 13, 2025
कार्यक्रमाचे तिकीट खूप महाग होते. काहींनी 10,000, 12,000 रुपयांमध्ये तिकीट घेतले, तर काहींनी तर 45,000 रुपये देखील खर्च केले. अशा परिस्थितीत, मेसीची झलक देखील न मिळाल्याने प्रेक्षकांचा राग कळवला आणि त्यांनी हिंसक वागणूक दाखवली.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.