Anushka Sharma Emotional Post on Virat's Test Retirement : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही नेहमीच नवरा विराट कोहलीसोबत त्यांची बॅकबोन म्हणून उभी राहिली आहे. मग ते क्रिकेट स्टेडियम असो किंवा मग त्याची क्रिकेटमधली चांगली खेळी. ती नेहमीच त्याची साथ देताना दिसते. फक्त त्याच्या चांगल्या काळात नाही तर त्याच्या कठीण काळात देखील अनुष्का ही विराटची साथ देताना दिसते. 12 मे रोजी म्हणजे आज विराट कोहलीनं (टेस्ट क्रिकेट) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर आता अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर या निमित्तानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्कानं विराटच्या नावाप्रमाणे असणाऱ्या त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि प्रवासाबद्दलही सांगितलं आहे.
अनुष्का शर्मानं विराट कोहलीनं कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील काही इनसाइड डिटेल्स सांगितल्या आहेत. 'लोकं रेकॉर्ड्स आणि जे काही यश मिळवलं त्याविषयी बोलतील, पण मला ते अश्रू आठवत राहतील जे तू कधी दाखवले नाहीस, तुझा संघर्ष जो कोणी पाहिला नाही आणि खेळाच्या या फॉर्मॅटवर तू दाखवलेलं निस्वार्थ प्रेम. या सगळ्या गोष्टींनी तुझ्याकडून काय घेतलं ते मला माहित आहे. प्रत्येक टेस्ट सीरिजनंतर तू थोडा अधिक समजूतदार, आणखी नम्र होऊन परतलास आणि हे सगळं पाहणं, अनुभवणं, माझ्यासाठी एक मोठी गोष्टी होताी. कसं कुणास ठाऊक, पण मला नेहमी वाटायचं की तू तुझी निवृत्ती ही कसोटी क्रिकेटमध्येच संपवशील, पण तू नेहमी तुझ्या मनाचं ऐकलंस. त्यामुळेच शेवटी एवढंच सांगायचंय आहे की, हा निरोप घेण्यासाठी तू सर्व काही कमावलं आहे', असं अनुष्का त्या पोस्टमध्ये म्हणाली.
दरम्यान, विराट कोहलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये विराट कोहली म्हणाला, 'कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मी बॅगी ब्लू रंगाचा पोशाख परिधान केला होता आणि त्याला 14 वर्षे झाली. खरं सांगायचं झालं तर, हा फॉरमॅट मला एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जाईल याची मी कधीच कल्पनाच केली नव्हती. या फॉरमॅटने माझी खरी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे माझ्यासोबत ठेवेन असे धडे मला कसोटी क्रिकेटने शिकवले. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत खेळ्यात खास खोलवर रुझलेले वैयक्तिक गुण असतात.'
पुढे त्याला टेस्ट क्रिकेटनं त्याला काय दिलं हे सांगत विराट पुढे म्हणाला, 'शांतपणे खेळणे, लांबलचक दिवस, छोटे छोटे पण महत्त्वाचे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. आता मी फॉरमॅटमधून बाहेर पडतोय. हे सोपं नाही, पण हेच मला आता योग्य वाटतंय. मी माझ्याकडे जे होतं ते सगळं मी दिलं आणि त्यानं मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिलं. मी कृतज्ञतेनं अन् भरल्या मनाने निघून जातोय ते या खेळासाठी, मी ज्यांच्यासोबत मैदान शेअर केलं त्यांच्यासाठी आणि वाटेत मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी आनंदानं पाहत राहीन याची मला खात्री आहे.'