Arundhati Reddy bhirthday: एके काळी हैद्राबादच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणारी, आज भारताच्या क्रिकेट संघात आहे 'ऑल्टउंडर'

  Arundhati Reddy life story: भारतीय संघातील क्रिकेटपटू अरुंधती रेड्डी ही दमदार खेळाडू आज तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताच्या क्रिकेट संघात ऑल्टउंडर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अरुंधतीचा प्रवास खूप खडतर होता. 

Updated: Oct 10, 2025, 12:09 PM IST
Arundhati Reddy bhirthday: एके काळी हैद्राबादच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणारी, आज भारताच्या क्रिकेट संघात आहे 'ऑल्टउंडर'

Arundhati Reddy bhirthday: हैदराबादची क्रिकेटपटू अरुंधती रेड्डी हिने आजवर भारताकडून 47आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, तिने 45 विकेट्स घेतल्या आहेत. पण या आकड्यांच्या मागे आहे तिची आणि तिच्या आईची प्रेरणादायी गोष्ट. 4 ऑक्टोबर 1997 ला हैद्राबादमध्ये जन्मलेल्या अरुंधती रेड्डीचा क्रिकेटर बनण्या पर्यंतचा प्रवास अतिशय कठीण  होता. 

Add Zee News as a Preferred Source

अरुंधती आणि तिच्या आईची प्रेरणादायी गोष्ट
अरुंधतीसाठी क्रिकेट हा फक्त खेळ नव्हता, तर तिच्या आई भाग्य रेड्डी यांचं अपूर्ण स्वप्न होतं. बाराव्या वर्षी गल्लीत भाऊ रोहितसोबत खेळायला सुरुवात केलेली अरुंधती आज भारतीय संघाची महत्त्वाची सदस्य आहे. भाग्य या स्वतः व्हॉलीबॉल खेळाडू होत्या, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना खेळ सोडावा लागला. त्यामुळे त्यांनी ठरवलं की मुलीला असं होऊ देणार नाहीत.

मध्यमवर्गीय परिस्थिती
मध्यमवर्गीय परिस्थितीतही त्यांनी अरुंधतीला क्रिकेट कोचिंग सेंटरमध्ये दाखल केलं. रोज पहाटे चार वाजता उठून तिला मैदानावर नेणं, डबा तयार करणं, शाळेत सोडणं, संध्याकाळी पुन्हा सरावासाठी नेणं, या  अथक प्रयत्नांनी अरुंधतीचं करिअर घडवलं.

राहुल द्रविडप्रमाणे विकेटकीपर व्हायचं होतं, पण... 
सुरुवातीला अरुंधतीला राहुल द्रविडप्रमाणे विकेटकीपर व्हायचं होतं, पण कोच गणेश यांनी तिच्या बॉलिंगची गती ओळखली आणि तिला ऑलराउंडर बनवलं. 15व्या वर्षी ती हैदराबादच्या अंडर-१९ संघात निवडली गेली आणि नंतर संघाची कर्णधारही झाली. 2017 मध्ये ती इंडियन रेल्वे संघात दाखल झाली आणि 2018 मध्ये अंडर-23 इंटर-झोनल स्पर्धेत चार सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे तिला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सिरीज  आणि नंतर टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळणायची संधी मिळाली.

महिला प्रीमियर लीगमध्ये दमदार पुनरागमन
नवीन गोलंदाजांच्या आगमनामुळे तिला काही काळ संघाबाहेर रहावं लागलं, पण हार न मानता तिने केरळमध्ये कोच बिजू जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलं आणि दिल्ली कॅपिटल्सच्या महिला प्रीमियर लीगमध्ये दमदार पुनरागमन केलं.

सध्या ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळलत  असून  आयसीसी महिला विश्वचषकासाठी तयारी करत आहे. अरुंधती म्हणते, “आईचा माझ्यावरचा विश्वास हेच माझं बळ आहे. मी प्रत्येक आव्हानावर मात करून सर्वोत्तम ऑलराउंडर बनण्याचं स्वप्न पाहते.”

भारतीय महिला क्रिकेटर अरुंधती रेड्डीची कहाणी  ही एका आईच्या त्यागाची आणि मुलीच्या जिद्दीची आहे, जिथे स्वप्नांनी वास्तवाला हरवलं.

FAQ

1. अरुंधतीने कोणत्या स्पर्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली?

तिने 2018 मध्ये अंडर-23 इंटर-झोनल स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत पदार्पण केले.

2. तिने आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत?

अरुंधतीने 47 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 45 विकेट्स घेतल्या आहेत.

3. अरुंधतीने कोणत्या स्पर्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली?

तिने 2018 मध्ये अंडर-23 इंटर-झोनल स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत पदार्पण केले.

 

About the Author