VIDEO: रोहितची विकेट गेल्यानंतर रितीकासोबत अश्विनच्या पत्नीने केलं असं की...

रोहितची विकेट गेल्यावर त्याची पत्नी रितीकाची रिएक्शन पाहण्याजोगी होती.

Updated: May 1, 2022, 10:17 AM IST
VIDEO: रोहितची विकेट गेल्यानंतर रितीकासोबत अश्विनच्या पत्नीने केलं असं की... title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये अखेर मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले. मुंबईने राजस्थानचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 30 एप्रिल रोजी रोहित शर्माच्या वाढदिवशी खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने 5 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला. मात्र या सामन्यात रोहित शर्माला बॅटने काही खास कमाल दाखवता आली नाही.

वाढदिवसाच्या दिवशी रोहित शर्मा मोठा स्कोर करून गिफ्ट देईल अशी चाहत्यांची अपेक्षा होता. मात्र अवघे 4 बॉल खेळून झाल्यावर रोहितने चाहत्यांच्या या अपेक्षांवर पाणी फेरलं. फक्त 2 रन्स करून तो माघारी परतला. दरम्यान रोहितची विकेट गेल्यावर त्याची पत्नी रितीकाची रिएक्शन पाहण्याजोगी होती.

तिसरी ओव्हर राजस्थानकडून आर अश्विन टाकत होता. यावेळी तिसऱ्या चेंडूवर रोहितला स्वीप करून सिक्स मारायचा होता. पण असं करण्याच्या नादात तो कॅचआऊट झाला. यावेळी स्टँडवर बसलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह खूपच निराश दिसत होती. 

रोहितला पुन्हा एकदा लवकर आऊट झाल्याचे पाहून रितिकाचे डोळे पाणावले होते. मात्र या घटनेनंतर तातडीने स्टँडमध्येच बसलेल्या रविचंद्रन अश्विनच्या पत्नीने सर्वांची मनं जिंकली. तिने तातडीने रितिकाजवळ येऊन तिला मिठी मारली. दरम्यान ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. 

दरम्यान आर अश्विनची पत्नी प्रीती नारायण हिने केलेल्या कृत्यची सोशल मीडियावर प्रशंसा केली जातेय. सोशल मीडियावर रितिका सजदेह आणि प्रीती नारायण यांच्यातील हा गोंडस क्षण प्रेक्षकांना खूप आवडला आणि आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.