Asia Cup 2023 : येत्या बुधवारपासून एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. एशिया कपसाठी नुकतंच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यावेळी पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या के एल राहुलला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र एशिया कपच्या पहिल्या सामन्यात के.एल राहुल खेळू शकणार नसल्याचे संकेत सिलेक्शन समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिले होते. अशातच आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात के.एल राहुल खेळणार की नाही यावरील अपडेट समोर आलं आहे. 


कॅडी मध्ये रंगणार महामुकाबला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 ऑगस्ट रोजी एशिया कपचा ( Asia Cup 2023 ) पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एशिया कपचे सामने रंगणार आहेत. दुसरीकडे टीम इंडियाचा फलंदाज श्रेयस अय्यरने फिटेनेस टेस्ट पास केली आहे. अशातच के.एल राहुल संदर्भात देखील एक मोठी अपडेट समोर आली आहे. 


के.एल राहुल कधी देणार फिटनेस टेस्ट


के.एल राहुलने अजूनही फिटनेस टेस्ट दिलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, एशिया कप ( Asia Cup 2023 ) च्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी के.एल राहुल फीट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान के.एल राहुलबाबतचा निर्णय 2 सप्टेंबर रोजी कॅंडीमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी घेतला जाणार आहे. बेंगळुरूच्या अलूर इथल्या आशिया कप शिबीर संपल्यानंतर रोहित शर्मा आणि कंपनी मंगळवारी श्रीलंकेला रवाना होणार आहे.


बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिले अपडेट


इनसाइडस्पोर्टला बीसीसीआय ( BCCI ) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलबाबतचा निर्णय सामन्याच्या दिवसाच्या जवळ घेतला जाईल. के.एल राहुलने प्रॅक्टिस सेशनमध्ये चांगली कामगिरी केली. पण तो अजूनही 100 टक्के तंदुरुस्त झालेला नाही. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला अजून काही दिवस बाकी आहेत. आम्हाला आशा आहे की तो तंदुरुस्त असेल. पण असं नाही झालं तर इशान बॅकअप म्हणून आहे.


राहुलवर नुकतीच करण्यात आली सर्जरी


केएल राहुलच्या मांडीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. सर्व खेळाडूंच्या फीटनेस टेस्ट घेण्यात आली. मात्र यावेळी केएल राहुलला यो-यो टेस्टमधून सूट देण्यात आली. राहुलला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. त्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानाबाबतचा निर्णय 1 सप्टेंबर रोजी कॅंडीमध्ये होणाऱ्या शेवटच्या सराव सत्रानंतर घेतला जाईल.