)
Asia Cup 2025 : 9 सप्टेंबर पासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यात होणार असून भारताचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळलं जाईल. यंदाचा आशिया कप (Asia Cup 2025) हा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. आता आशिया क्रिकेट काउन्सिलने आशिया कप स्पर्धेसाठी मॅच रेफरीच्या टीमची घोषणा केली आहे.
अंपायर्सच्या टीममध्ये अनेक देशांचे अनुभवी अधिकारी आहेत. भारताकडून वीरेंद्र शर्मा आणि रोहन पंडित अंपायरिंग करतील, तर श्रीलंकेकडून रवींद्र विमलासिरी आणि रुचिरा पल्लियागुरुगे यांना अंपायरिंग टीममध्ये स्थान मिळाले आहे. याशिवाय, अफगाणिस्तानचे अहमद पक्तिन आणि इजतुल्लाह सफी, पाकिस्तानचे आसिफ याकूब आणि फैसल आफ्रिदी तर बांगलादेशचे गाजी सोहेल आणि मसुदुर रहमान हे अंपायर्स पॅनेलचा भाग आहेत.
आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अँडी पायक्रॉफ्ट यांना मॅच रेफ्रीची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या भारत - पाक सामन्यात रुचिरा पल्लियागुरुगे आणि मसुदुर रहमान मैदानावरील अंपायर असतील, जे सामन्यादरम्यान मैदानावरील प्रत्येक निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवतील. अंपायर रुचिरा पल्लियागुरुगेबद्दल बोलायचे झाले तर, ते अनेक चुकीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. 2019 च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले. ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी श्रीलंका आणि भारत यांच्यातील वनडे सीरिज दरम्यान त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले होते, जे पुनरावलोकनामुळे बदलले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, महत्वाच्या सामन्यात अंपायर म्हणून रुचिरा पल्लियागुरुगे एन्ट्री कोणत्याही संघासाठी हानिकारक ठरू शकतो.
भारतीय संघांचा ग्रुप ए मध्ये समावेश असून याव्यतिरिक्त यामध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमान संघ सुद्धा आहेत.
10 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध यूएई
14 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान
19 सप्टेंबर 2025: भारत विरुद्ध ओमान
या ग्रुप ए मधील सर्वाधिक सामने जिंकलेला संघ पुढील फेरीचे सामने खेळेल.
आशिया कप 2025 च्या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स चॅनलवर होईल. तर ऑनलाईन युझर्स सोनी ऍप तसेच वेबसाईटवर या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. भारतातील फ्री डिश वापरणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर सामना मोफत पाहू शकतील. मल्टीनेशनल स्पर्धांमध्ये, डीडी स्पोर्ट्स भारताच्या सामन्यांव्यतिरिक्त महत्त्वाचे सामने मोफत दाखवते.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मॅच रेफ्री आणि अंपायर्स कोण आहेत?
मॅच रेफ्री: अँडी पायक्रॉफ्ट
मैदानी अंपायर्स: रुचिरा पल्लियागुरुगे आणि मसुदुर रहमान
भारताचा पहिला सामना कोणाविरुद्ध आणि कधी आहे?
भारताचा पहिला सामना यूएई विरुद्ध 10 सप्टेंबर 2025 रोजी होईल.
रुचिरा पल्लियागुरुगे यांच्याबद्दल काय विवाद आहे?
रुचिरा पल्लियागुरुगे यांनी 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज सामन्यात आणि गेल्या वर्षी श्रीलंका-भारत वनडे मालिकेत अनेक चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली आहे. त्यांचे चुकीचे निर्णय पुनरावलोकनामुळे बदलले गेले होते.