Asia Cup Final 2025 Ind Vs Pak : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या खेळात भारतीय संघानं पाकच्या संघाला 5 गडी राखत धूळ चारली. 9 व्यांचा भारतानं आशिया चषक आपल्या नावे केला आणि संपूर्ण देशवासियांना आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक निमित्त दिलं. तिथं संघानं सामना केला आणि इथं भारतात जणू दिवाळीच सुरू झाली. रात्री उशिरापर्यंतची फटाक्यांची आतषबाजी असो किंवा मग सोशल मीडियावरून विजयोत्सावाचे फोटो स्टेटस, स्टोरी किंवा पोस्टमध्ये शेअर करणं असो. हे सत्र सुरूच राहिलं आणि बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा यामध्ये मागे राहिले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे इथं लक्ष वेधलं ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टनं.
अतिशय बोलकी आणि पाकिस्तानवर खोचक, उपरोधिक टीप्पणी करणारी बोस्ट सिरियर बच्चन यांनी त्यांच्या x पोस्टच्या माध्यमातून शेअर केली. या पोस्ट्च्या माध्यमातून त्यांनी नाही म्हटलं तरी पाकचा माजी खेळाडू शोएब अख्तरवरही प्रहारच केला. बिग बींनी लिहिलं, 'जिंकलो!! चांगलं खेळला 'अभिषेक बच्चन'... तिथं जीभ घसरली आणि इथं फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्रपक्षण काहीही न करता शत्रूला कोलमडवून टाकलं!! बोलती बंद!!' असं लिहित जय हिंद! जय भारत अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया देत त्यांनी नाव न घेता खरंच अख्तरची बोलती बंद केली. त्यांची ही कमेंट नेमकी कोणासाठी होती हे फॉलोअर्सच्याही लक्षात आलं आणि मग काय, या एका प्रतिक्रियेवर असंख्य नेटकरी व्यक्त होण्यास सुरुवात झाली.
T 5516(i) - जीत गये !! .. well played 'Abhishek Bachchan' .. उधर ज़बान लड़खड़ाई, और इधर, बिना batting bowling fielding किए, लड़खड़ा दिया दुश्मन को !!
बोलती बंद !!
जय हिन्द ! जय भारत ! जय माँ दुर्गा !!!!— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 28, 2025
भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तर अभिषेक शर्मा आणि अभिषेक बच्चन यांच्यात चांगलाच गोंधळलेला दिसला. सामन्यापूर्वी भारताविरोधात पाकिस्तानची रणनिती काय असावी, याबाबतची चर्चा सुरू असतानाच पाकनं जर 'अभिषेक बच्चन'ला बाद केलं तर सामन्यावर त्यांना पकड मिळवता येईल. कारण भारताची मधली फळी चांगलं खेळत नाहीये. शोएबच्या बोलण्यानं तिथं असणाऱ्यांनाही हसू आलं आणि एका महिलेनं त्याची चूक सुधारत अभिषेक शर्माचं नाव त्याला लक्षात आणून दिलं आणि त्यानंतर त्यानं परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. बस्स पुढे काय? हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आता बिग बींची प्रतिक्रिया पाहता तो त्यांच्यापर्यंतही पोहोचला आणि योग्य वेळी त्यांनी या व्हिडीओला उत्तर दिलं असं म्हणणं गैर ठरणार नाही हेच खरं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
CSK
(20 ov) 212/2
|
VS |
DC
189(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Delhi Capitals by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 219/6
|
VS |
PBKS
223/4(18.5 ov)
|
| Punjab Kings beat Sunrisers Hyderabad by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.