Asia Cup 2025 : आशिया कप 2025 चं आयोजन सप्टेंबर महिन्यात होऊ शकतं. आता याबाबत आशिया क्रिकेट काउन्सिलने एक प्लान तयार केला आहे. एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे सर्व बोर्डांशी चर्चा करत आहेत. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे देखील चेअरमन आहेत. मात्र मोहसिन यांचं टेन्शन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने वाढवलं आहे. टीम इंडिया आगामी आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup 2025) सहभागी होणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जर भारत या स्पर्धेत खेळला नाही तर आशिया क्रिकेट काउन्सिलला कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागेल. ज्यामुळे सध्या मोहसिन नकवी काळजीत पडले आहेत.
आशिया क्रिकेट काउन्सिलने बीसीसीआयला आशिया कपच्या शेड्युलला लवकरात लवकर अंतिम स्वरूप द्यावं असं सांगितलं आहे. मीडिया हक्क धारक आणि प्रायोजकांना होणाऱ्या संभाव्य महसुलाच्या नुकसानीबद्दल चिंता वाढत आहे. आशिया कपच्या वेळापत्रकावरील अनिश्चिततेमुळे प्रायोजक आणि मीडिया हक्क धारकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या आठवड्याच्या शेवटापर्यंत बीसीसीआयने शेड्युलबाबत अंतिम निर्णय द्यावा असा आग्रह धरला आहे.
आशिया क्रिकेट काउन्सिलने बीसीसीआय, मीडिया प्रायोजक इत्यादींशी बातचीत केली आहे. यात एसीसीने अशा मुद्द्यांवर बोलणी केली ज्याबाबत त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात प्रायोजक आणि मीडिया हक्क धारक यांचा प्रश्न महत्वाचा आहे, भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आशिया कपच्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार आहेत. त्यांनी सुद्धा या प्रकरणांमध्ये चिंता व्यक्त केली आहे.
पहलगाम भागात 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जवळपास 26 पर्यटकांना ठार केलं होतं. त्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील जवळपास 9 दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले. यामुळे भारताने पाकिस्तान सोबत कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ नये अशी मागणी होत होती. बीसीसीआयने अद्याप टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये खेळणार की नाही याबाबत स्पष्टता दिली नाही. मात्र त्यापूर्वीच आशिया कप 2025 चे ब्रॉडकास्टिंग अधिकार असणाऱ्या सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने स्पर्धेचे प्रोमो दाखवण्यात सुरुवात केली. ज्यात टीम इंडियाचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव, बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो आणि श्रीलंकेचा चरित असलांका इत्यादी दिसत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बहुप्रतीक्षित आशिया कप 2025 स्पर्धा ही 5 सप्टेंबर पासून सुरु होईल तर याचा अंतिम सामना हा 21 सप्टेंबर रोजी पार पडेल. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आशिया कप 2025 मध्ये भारत - पाकिस्तान सामना महामुकाबला 7 सप्टेंबर रोजी होईल. मात्र अद्याप याबाबत आयसीसीकडून कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही. भारत - पाकिस्तान सामना हा आशिया कप स्पर्धेतील सर्वात चर्चित सामना असणार आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.