Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 12 जानेवारी पर्यंत आपले संघ जाहीर करण्यास सांगितले होते. त्यानुसार ऑस्ट्रेलिया संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champians Trophy 2025) साठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. 2017 नंतर आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची 8 संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डाने एकापेक्षा एक खेळाडूंची निवड केली आहे. परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही की संघाचे नेतृत्व सध्या दुखापतग्रस्त असलेल्या पॅट कमिन्सकडे देण्यात आले आहे. पॅट कमिन्सला बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 2023 चा आयसीसी वनडे वर्ल्ड कप, 2023 ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे दोघे ओपनिंग करताना दिसू शकतात. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचं चांगलं कॉम्बिनेश आहे. तर ॲरॉन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श हे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये गेमचेंजर ठरू शकतात. तर वेगवान गोलंदाजीची धुरा पॅट कमिन्स मिचेल स्टार्क, नाथन एलिस, जोश हेजलवुड सारख्या खेळाडूंच्या खांद्यावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया बी ग्रुपमध्ये असून त्यांच्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व ग्रुप स्टेज सामने हे पाकिस्तानात खेळवले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया श्रीलंकेसोबत दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे.
हेही वाचा : IPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती
पॅट कमिंस (कर्णधार), एलेक्स कॅरी, नाथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रैविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, मैथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, एडम जाम्पा.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 येत्या 19 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर याचा शेवटचा सामना हा 9 मार्च रोजी खेळवण्यात येईल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 12 जानेवारी पर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची मुदत देण्यात आलेली होती. मात्र बीसीसीआयने आयसीसीकडे ही मुदत वाढवून मागितली असून राजीव शुक्ला यांच्या माहितीनुसार बीसीसीआय 19 जानेवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करेल.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.