'या' संघाने आगामी ODI टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा! 'या' दमदार गोलंदाजांचे पुनरागमन

Odi and T-20 Cricket Match: क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळांपैकी एक असून क्रिकेट सामन्यांविषयीच्या बातम्या आणि संघातर्फे होणाऱ्या घोषणांची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच 'या' संघाने आगामी वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे.   

Cricket Country | Updated: Oct 7, 2025, 02:36 PM IST
'या' संघाने आगामी ODI टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा! 'या' दमदार गोलंदाजांचे पुनरागमन

Odi and T-20 Cricket 2026: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या बहुप्रतीक्षित मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघांची घोषणा केली.

Add Zee News as a Preferred Source

कर्णधार पॅट कमिंस संघा बाहेर
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. महत्वाची बाब म्हणजे कर्णधार पॅट कमिंस त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. पॅट कमिंसच्या जागी मिचेल मार्श संघाचं नेतृत्व करणार.

मिचेल स्टार्कचा कमबॅक
या संघात पुनरागमन करणारा दमदार खेळाडू म्हणजे 'मिचेल स्टार्क'. बराच काळ दुखापतीमुळे बाहेर असलेला स्टार्क आता पुन्हा फिट झाला आहे आणि त्याच्या येण्याने ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

जाणून घ्या सामन्यांविषयीची महत्वाची माहिती
संघात काही नवीन चेहरेही दिसणार आहेत. मॅथ्यू रेनशॉ, मिचेल ओवेन् आणि मॅथ्यू शॉर्ट यांना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, मार्नस लाबुशेन याला मात्र या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलं आहे. तसेच, ग्लेन मॅक्सवेल याला मनगटाच्या दुखापतीमुळे  विश्रांती देण्यात आली आहे.

मालिकेचे वेळापत्रक काय?
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील ही मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तीन वनडे सामने पर्थ, अ‍ॅडलेड आणि सिडनी येथे होतील, तर पाच टी-२० सामने कॅनबेरा, मेलबर्न, होबार्ट, गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेन येथे खेळले जातील.या संघात एकाहून एक अव्वल आणि अनुभवी खेळाडूंनी असून, ऑस्ट्रेलिया या मालिकेत भारताला दमदार टक्कर देणार यात शंका नाही. 

ऑस्ट्रेलियाचा संघ (ODI आणि T20 मालिकेसाठी)

1. मिचेल मार्श (कर्णधार)
2. मिचेल स्टार्क
3. मॅथ्यू रेनशॉ
4. मिचेल ओवेन्
5. मॅथ्यू शॉर्ट
6. जोश हेजलवूड
7. अ‍ॅलेक्स केरी
8. ट्रॅव्हिस हेड
9. डेविड वॉर्नर
10. कॅमरॉन ग्रीन
11. सीन अबॉट
12. अ‍ॅश्टन एगर
13. अ‍ॅरॉन हार्ड
14. टिम डेविड
15. जॉश इंग्लिस

या संघात एकाहून एक अव्वल आणि अनुभवी खेळाडूंनी असून, ऑस्ट्रेलिया या मालिकेत भारताला दमदार टक्कर देणार यात काही शंका नाही.
 

FAQ

1. ODI आणि T20 मालिकेचे वेळापत्रक काय?
ODI (३ सामने): १९ ऑक्टोबर - पर्थ; २२ ऑक्टोबर - अ‍ॅडलेड; २५ ऑक्टोबर - सिडनी.

T20 (५ सामने): २८ ऑक्टोबर - कॅनबेरा; ३१ ऑक्टोबर - मेलबर्न; ३ नोव्हेंबर - होबार्ट; ६ नोव्हेंबर - गोल्ड कोस्ट; ९ नोव्हेंबर - ब्रिस्बेन.

2.  मिचेल स्टार्कचा संघात समावेश कसा झाला?
दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेला मिचेल स्टार्क आता पूर्ण फिट झाला असून, त्याचा कमबॅक होत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी मजबूत होईल.

3. पॅट कमिंस संघाबाहेर कशामुळे राहिला?
पॅट कमिंसला पाठीच्या दुखापतीमुळे ODI आणि T20 मालिकेत खेळता येणार नाही. त्याच्या जागी मिचेल मार्श कर्णधारपद सांभाळणार आहे.

 

About the Author