Axer Patel New bungalow:टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर, अक्षर पटेलने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक नवीन सुरुवात केली आहे, क्रिकेट कारकिर्दीसहित अक्षरचं वयक्तीक आयुष्यालादेखील भरभराटी आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी, अक्षर आणि त्याची पत्नी मेहा पटेल यांनी गुजरातमधील नाडियाद येथील त्यांच्या आलिशान नवीन बंगल्यात हाऊसवॉर्मिंग समारंभ आयोजित केला होता.
घराचे नाव 'हक्ष व्हिला'च का? 'हे' आहे कारण
अक्षर आणि मेहाने त्यांच्या नवीन घराचे त्यांच्या मुलाच्या नवावर 'हक्ष व्हिला' असे ठेवले आहे. डिसेंबर 2024 मध्येच त्यांनी हक्षचे स्वागत केले. तसेच त्यांच्या मुलाच्या नावावर घराचे नाव देणे हा या जोडप्यासाठी खूप भावनिक क्षण होता. गृहप्रवेशाचा कर्यक्रम 12 नोव्हेंबर 2024 रोजी झाला असून या शुभकार्यात त्यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांसह पारंपारिक पद्धतीने वास्तु पूजा केली.
सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो
मेहा पटेलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हाऊसवॉर्मिंग सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अक्षर पारंपारिक कुर्ता-पायजमामध्ये दिसत होता, तर मेहा सुंदर गुजराती शैलीच्या साडीमध्ये दिसत होती. घराचे आतील भाग खूपच आलिशान आणि आकर्षक आहे एवढेच नाही तर या घरामध्ये आधुनिक आणि पारंपारिक दोन्ही डिझाइनचा छान मिलाफ आहे.
क्रिकेट जगतातील खास पाहुण्यांचे आगमन
या कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक 'हेमांग बदानी' आणि संघाचे क्रिकेट संचालक 'व्यंकटपती राव' हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. अक्षरचे दिल्ली फ्रँचायझीशी खोलवर नाते आहे, कारण त्याला आयपीएल 2025 साठी संघाचा नवीन कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
करिअरसोबत वैयक्तिक आयुष्यातही प्रगती
गेल्या दोन वर्षांचा काळ अक्षर पटेलसाठी खास होता. त्याने 2024 चा टी-20 विश्वचषक आणि 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीच, पण त्याच्या शांत स्वभावाने आणि जबाबदार वागण्याने चाहत्यांची मनेही जिंकली. 2024 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील त्याची धडाकेबाज खेळीने संघाला भरपूर मदत झाली होती. ती आजही संस्मरणीय आहे.
बालपणाची रंजक पण गोड आठवण
अक्षरने अलीकडेच पत्रकार विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला नाडियाद येथील त्याचे जुने घर खूप आठवते, जिथे तो त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळायचा. आता, तोच मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याच शहरात त्याच्या कुटुंबासह एक नवीन घर बांधत आहे, हा त्याच्या कठोर परिश्रम आणि दर्जेदार खेळीचा परिणाम आहे.
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
21/0(6.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 75/9
|
VS |
INA
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.