)
Cricket News : क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांपैकी एक पैकी एक आहे. काही जबरा फॅन्स आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी कोणत्याही ठरला पोहोचतात. वेळेला ते सर्व सुरक्षा कुंपण देखील भेदून क्रिकेटरला भेटायला पोहोचतात, अशीच एक घटना गद्दाफी स्टेडियममध्ये घडली. बुधवारी पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (PAK VS SA) सामन्यात पाकिस्तानने 93 धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील पहिला सामना जिंकला. गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने 277 धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिकेला दिलं होतं मात्र पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजी समोर दक्षिण आफ्रिकेचा संघ 183 धावांवर ऑल आउट झाला. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम खूप दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यासाठी मैदानात आला. तेव्हा बाबर आझमला (Babar Azam) भेटण्यासाठी त्याचा एक चाहता भिंत ओलांडून ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला.
स्टेडियममध्ये एक चाहता बाबर आझमला भेटण्यासाठी भिंत ओलांडून ड्रेसिंग रूममध्ये घुसत होता. त्यावेळी पाकिस्तान टेस्ट संघाच्या एका सपोर्टींग स्टाफने त्याला ड्रेसिंग रूममध्ये घुसताना पाहिलं आणि सर्व हैराण झाले. चाहत्याला त्यांनी बाहेर जायला सांगितलं पण तो काही ऐकेना. तेव्हा सिक्योरिटी गार्ड तेथे पोहोचले आणि त्यांनी चाहत्याला पकडून त्यांच्या सोबत नेलं. तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार राहिलेल्या बाबर आझमने बुधवारी त्याचा 31 वा वाढदिवस साजरा केला. पण घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये तो खास कमाल दाखवू शकला नाही.
Unbelievable Next Level Stardom of King Babar Babarazam pic.twitter.com/prgk9cZgWT
October 15, 2025
पहिल्या इनिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना बाबरने 48 बॉलमध्ये 23 धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 72 बॉलमध्ये 42 धावा केल्या. या दरम्यान, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 3000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू बनला. WTC मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रूट यांच्या नावावर आहे.
बाबर आझमला भेटण्यासाठी चाहत्याने काय केलं?
उत्तर: सामन्यादरम्यान एक चाहता बाबर आझमला भेटण्यासाठी स्टेडियमच्या भिंती ओलांडून ड्रेसिंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तान टेस्ट संघाच्या सपोर्टिंग स्टाफने त्याला पाहिलं आणि हैराण झालं. चाहत्याला बाहेर जायला सांगितलं, पण तो ऐकला नाही. तेव्हा सिक्युरिटी गार्ड्स पोहोचले आणि त्याला पकडून नेलं. ही घटना बाबरच्या परतेल्यानंतर घडली, ज्यामुळे स्टेडियममधील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले.
बाबर आझमने या सामन्यात किती धावा केल्या?
उत्तर: पहिल्या इनिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना बाबरने ४८ चेंडू खेळून २३ धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ७२ चेंडू खेळून ४२ धावा केल्या. घरच्या मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात तो खास कमाल दाखवू शकला नाही, तरीही त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये ३००० धावा पूर्ण करून आशियातील पहिला क्रिकेटर म्हणून विक्रम केला.
गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेमकं काय घडलं?
उत्तर: पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील पहिल्या सामन्यात ९३ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने २७७ धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ १८३ धावांवर ऑल आउट झाला. याच सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम खूप दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मैदानावर परतला आणि त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. मात्र, त्याच्या चाहत्याने सुरक्षा भेदून ड्रेसिंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे सिक्युरिटीने त्याला पकडलं.