टीम इंडियाला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकून जवळजवळ दोन आठवडे होत आले आहेत. अशातच आता गुरुवारी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी विजेत्या संघातील खेळाडूंना बक्षीस जाहीर केले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना आणि सपोर्टिंग स्टाफला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मोठ्या रक्कमेचे बक्षीस जाहीर केले आहे.
खेळाडूंना प्रत्येकी 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. खेळाडूंव्यतिरिक्त, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना देखील 3 कोटी दिले जातील, तर कोचिंग स्टाफच्या सहाय्यक सदस्यांना प्रत्येकी 50 लाख दिले जातील. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अशाप्रकारे, बोर्ड खेळाडू आणि कोचिंग स्टाफला एकूण 58 कोटी रुपयांचे बक्षीस म्हणून वितरित करेल.
हे ही वाचा: सुनीता विल्यम्स यांचा पगार किती? उत्तर जाणून तुम्हाला बसेल धक्का
BCCI (Board of Control for Cricket in India) announces prize money for Champions Trophy winning team
Each player will get Rs 3 crore each, head coach Rs 3 crore, supporting coaching staff Rs 50 lakh: BCCI secretary Devjit Saikia to ANI pic.twitter.com/bex7tODWhv
— ANI (@ANI) March 20, 2025
यावेळी भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला होता. या स्पर्धेचे यजमान पाकिस्तान होते आणि भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर आयसीसीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली, ज्यामध्ये भारताने दुबईमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह सर्व सामने खेळले.
हे ही वाचा: साताऱ्याजवळ वसलेलं ही ठिकाणे तुम्हाला करतील मंत्रमुग्ध
टीम इंडियाने या स्पर्धेत अपराजित राहून हे विजेतेपद पटकावले. ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर पुन्हा एकदा फायनलमध्ये न्यूझीलंड त्याच्यासमोर होता. न्यूझीलंडचा पराभव करून भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले.
हे ही वाचा: विराटच्या टीकेनंतर 'फॅमिली रुल्स'बद्दल आले मोठे अपडेट, BCCI ने टीम इंडियाला दिला धक्का!
फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितशिवाय श्रेयस अय्यरने 48 धावांची नाबाद खेळी खेळली आणि केएल राहुलने 34 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला हा विजय मिळवून दिला. या विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारत आला होता. याआधी कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 150/7
|
VS |
UAE
151/5(19.4 ov)
|
| United Arab Emirates beat Canada by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.