India vs New Zealand Schedule ODI and T20I 2026: टी20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026 ) तयारीसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलं आहे. बीसीसीआयच्या 28व्या अपेक्स कौन्सिल मिटिंगदरम्यान या मालिकेची घोषणा करण्यात आली. ही मालिका भारतात 11 जानेवारी 2026 पासून सुरु होणार असून एकूण आठ सामने खेळवले जाणार आहेत. त्यात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांचा समावेश आहे. 11 जानेवारीला बडोद्यात पहिला वनडे, 14 जानेवारीला राजकोटमध्ये दुसरा तर 18 जानेवारीला इंदोरमध्ये तिसरा आणि अंतिम वनडे सामना खेळवला जाईल. यानंतर 21 जानेवारीपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत मैदानात उतरेल. ही पाच सामन्यांची टी20 मालिका भारताच्या टी20 वर्ल्ड कपपूर्वीची शेवटची तयारी असेल. 21 जानेवारीला नागपूरमध्ये पहिला सामना होणार असून 23 तारखेला रायपूर, 25 तारखेला गुवाहाटी, 28 ला विशाखापट्टणम आणि 31 जानेवारीला अंतिम टी20 सामना तिरुवनंतपुरममध्ये पार पडणार आहे.
11 जानेवारी पहिला वनडे बडोदा
14 जानेवारी दुसरा वनडे राजकोट
18 जानेवारी तिसरा वनडे इंदोर
21 जानेवारी पहिला टी२० नागपूर
23 जानेवारी दुसरा टी२० रायपूर
25 जानेवारी तिसरा टी२० गुवाहाटी
28 जानेवारी चौथा टी२० विशाखापट्टणम
31 जानेवारी पाचवा टी२० तिरुवनंतपुरम
पंचच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी बीसीसीआयने पाच अनुभवी आंतरराष्ट्रीय माजी पंचांच्या विशेष वर्किंग ग्रुपची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हे 'अंपायर कोचेस' देशभरातील पंचांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवतील. त्याचप्रमाणे, मॅच रेफरींच्या क्षमतेत सुधारणा करण्यासाठीही तिघा माजी रेफरींच्या दुसऱ्या कार्यसमितीचीही स्थापना करण्यात आली आहे. हे रेफरी सध्या कार्यरत रेफरींच्या कामगिरीचे निरीक्षण करतील आणि त्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देतील.
या वर्षीचा देशांतर्गत क्रिकेट हंगाम 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीने सुरुवात होईल, तर शेवट 3 एप्रिल 2026 रोजी सीनियर महिला इंटर-झोनल मल्टी-डे ट्रॉफीने होईल. रणजी ट्रॉफी यंदा दोन टप्प्यात 15 ऑक्टोबर ते 28 फेब्रुवारी अशी पार पडणार आहे. यंदा रणजी ट्रॉफीच्या फॉरमॅटमध्ये थोडा बदल करण्यात आला असून प्लेट गटातून एका संघाचं प्रमोशन आणि रीलिगेशन होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत अधिक स्पर्धात्मकता दिसून येणार आहे.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(29 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.