मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं क्रीडा विश्वातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती हिरावून नेल्या आहेत. क्रीडा विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. BCCI match referee आणि लेव्हल-2 कोच असलेल्या क्रिकेटपटूची कोरोना विरुद्ध झुंज अपयशी ठरली. BCCIचे मॅच रेफरी आणि Level-2 coach प्रशांत मोहपात्रा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी रणजी क्रिकेटर आणि ओडिशा क्रिकेट टीमचे कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. राज्यसभेचे माजी मंत्री रघुनाथ मोहपात्रा यांचं देखील काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर आता प्रशांत यांचं कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


कोरोनामुळे प्रशांत यांचं तब्येत जास्त बिघडली. त्यांना भुवनेश्वरच्या AIIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जास्त तब्येत बिघडल्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र प्रशांत यांची कोरोनाची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला.




सुरेश रैनाने ट्वीटरवर भावुक पोस्ट करत प्रशांत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रशांत मोहपात्रा यांनी 45 फर्स्ट क्लास आणि 17 लिस्ट ए सामने खेळले आहेत. आपल्या क्रिकेट करियरमध्ये त्यांनी एकूण 62 सामने खेळले आहेत.  रणजी ट्रॉफीमधून त्यांनी 1990मध्ये डेब्यू केलं होतं. 45 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 2196 धावा केल्या आहेत. 5 शतक आणि 11 अर्धशतक केले आहेत. 


क्रिकेट खेळणं थांबल्यानंतर ते क्रिकेटपासून दूर गेले नाहीत तर त्यांनी रेफरी म्हणून काम पाहिलं. त्यांनी एकूण 142 सामन्यांत रेफरीची भूमिका निभावली, ज्यात 48 प्रथम श्रेणी, 45 लिस्ट ए आणि 49 टी -20 सामन्यांचा समावेश आहे.