BCCI Review Meeting: टीम इंडियासाठी (Team India) खेळणं प्रत्येक तरूण खेळाडूचं स्वप्न असतं. टीम इंडियामध्ये आपलं सिलेक्शन (Team India selection) व्हावं यासाठी दिवस-रात्र खेळाडू स्वप्न पाहतात आणि त्यासाठी मेहनत करतात. मात्र इंटरनॅशनल टीममध्ये खेळण्याचं स्वप्न फार क्वचित लोकांचं पूर्ण होतं. अनेकदा खेळाडूंचं नशीब इतकं चांगलं असतं की, प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class cricket) न खेळताही त्यांना थेट टीम इंडियामध्ये संधी मिळते. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, युवा खेळाडूंना टीम इंडियासाठी खेळणं अजून खडतर होणार आहे. 


अशी मिळणार टीम इंडियामध्ये जागा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने 1 जानेवारीला एक महत्त्वाची बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. यामध्ये भारतीय टीम (Team India) चे हेड कोच राहुल द्रविड, नियमित कर्णधार रोहित शर्मा, एनसीए हेड व्ही व्ही एस लक्ष्मण तसंच चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 


या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे, युवा खेळाडूंना भारतीय टीममध्ये खेळण्यासाठी पहिल्यांदा पुरेश्या प्रमाणात देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागणार आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता खेळाडूंना डायरेक्ट टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळणार नाहीये. 


अनेकदा असं पहायला मिळतं की, आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्या खेळाडूसाठी थेट टीम इंडियाचे दरवाजे खुले होतात. मात्र आता असं होणार नाहीये. जर युवा खेळाडू भारताकडून खेळू इच्छितात तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट (Domestic cricket) मध्ये आपला उत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.


BCCI ने उचललं मोठं पाऊल


बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी 20 सदस्यांची टीम निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता बीसीसीआय या खेळाडूंना फीट करण्यासाठी आहे. यामुळेच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी एनसीएला आयपीएल टीमसोबत खेळाडूंच्या सुरक्षेसाठी वर्कलोड मॅनेजमेंटवर काम करण्यास सांगितलंय.


बीसीसीआयने या बैठकीत सांगितलं की, आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंवर एनसीए लक्ष ठेवणार आहे. NCA ने आयपीएल फ्रेंचाइजीसोबत मिळून काम करावं असं आम्हाला वाटतं.


बीसीसीआयने अळा 20 खेळाडूंची निवड केलीये, जे या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा भाग असणार आहेत. या सर्व खेळाडूंना पुन्हा खेळण्याची संधी दिली जाईल ज्यामुळे वर्ल्डकपसाठी ते पूर्णपणे तयार असतील. बीसीसीआयच्या म्हणण्याप्रमाणे, खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाहीये.