)
BCCI on Moshin Naqvi : आशिया कप ट्रॉफी (Asia Cup Trophy) संदर्भातील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा वाद दुबई पोलिसांपर्यंत पोहोणार असून मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय या मुद्द्यावरून मोहसिन नक्वी विरुद्ध तक्रार करण्याची शक्यता आहे. मोहसिन नक्वीने आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर त्यांना मिळणारी विजेतेपदाची ट्रॉफी गायब केली होती. अजूनही ती ट्रॉफी त्यांच्या जवळच आहे. मोहसिन नक्वीचं म्हणणं आहे की ते ट्रॉफी तेव्हाच देतील जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार स्वतः आशियाई क्रिकेट काउन्सिलच्या ऑफिसमध्ये येतील. मोहसिन नक्वींच्या या हट्टानंतर आता बीसीसीआय त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी विरुद्ध चोरी आणि बेकायदेशीरपणे ट्रॉफी ताब्यात घेतल्याबद्दल तक्रार दाखल करू शकते. बीसीसीआयने नक्वी यांना ट्रॉफी परत करण्यासाठी फक्त 72 तासांचा वेळ दिला आहे, जर ते सहमत झाले नाहीत तर नक्वींवर कारवाई केली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय मोहसिन नक्वीला आशिया कप ट्रॉफी पाकिस्तानात घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी यूएईच्या अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहेत. एवढंच नाही तर मोहसिन नक्वीला एसीसी अध्यक्ष पदावरून हटवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरु आहे. अशातच प्रश्न हा आहे की मोहसिन नक्वी विरुद्ध दुबईत चोरीचा खटला दाखल झाला तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते. दुबईत चोरी करणं ही खूप मोठी शिक्षा आहे. तिथे चोरीच्या प्रकरणात दोषी आढळल्यास दंड आणि 5 ते 7 वर्षांची शिक्षा सुद्धा होऊ शकते. काही गंभीर चोरीच्या प्रकरणांमध्ये १५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद देखील आहे.
मीडियामध्ये अशा बातम्या सुद्धा आहेत की मोहसिन नक्वीने बीसीसीआय अधिकाऱ्यांची माफी सुद्धा मागितली आहे. तथापि, पीसीबी प्रमुखांनी याला स्पष्टपणे नकार केला आहे. मोहसिन नक्वी म्हणाले की त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आणि कोणाचीही माफी मागितली नाही. ते म्हणाले की तो भारताला आशिया कप ट्रॉफी देण्यास तयार आहे पण त्यासाठी सूर्यकुमार यादवला त्याच्याकडे येऊन ट्रॉफी घ्यावी लागेल.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा फायनल सामना रविवारी २८ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. सामन्याच्या अर्धातास अगोदर झालेला टॉस टीम इंडियाने जिंकला असून कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. पाकिस्तानच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. त्यांचे फलंदाज साहिबजादा फरहान (57) आणि फखर जमान (46) यांनी विस्फोटक फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावांची पार्टनरशिप केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही. सैम अयुबने 14 धावांची फलंदाजी केली त्यानंतर मात्र एकही फलंदाज दोन अंकी धावसंख्या करू शकला नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पुढील 31 धावांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानची पहिली विकेट 84 धावांवर गेली. त्यानंतर 113 ते 146 धावांदरम्यान पाकिस्तानच्या एकूण 9 विकेट्स पडल्या. पाकिस्तान संघ 146 धावांवर ऑल आउट झाला आणि त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान टीम इंडियाने 5 विकेट्स राखून पूर्ण केलं.
आशिया कप ट्रॉफी संदर्भातील वाद काय आहे?
उत्तर: आशिया कप फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले. विजेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यानंतर एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ती ट्रॉफी घेतली आणि भारताला देण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे आहे की ट्रॉफी फक्त तेव्हाच दिली जाईल जेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः एसीसी ऑफिसमध्ये येऊन घेतील. यामुळे बीसीसीआयने नक्वींवर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
मोहसिन नक्वी कोण आहेत आणि त्यांनी काय केले?
उत्तर: मोहसिन नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आहेत. फायनलनंतर त्यांनी ट्रॉफी ताब्यात घेतली आणि ती अद्याप त्यांच्याकडे आहे. ते ट्रॉफी पाकिस्तानात घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत, पण बीसीसीआय यूएई अधिकाऱ्यांसोबत संपर्कात असून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.
दुबईत चोरीच्या खटल्यात नक्वींना काय शिक्षा होऊ शकते?
उत्तर: दुबईत चोरी ही गंभीर गुन्हा मानला जातो. दोषी आढळल्यास दंडासोबत ५ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये १५ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.