IPL 2025 च्या सुरुवातीच्या मॅचमधून बाहेर राहणार 'हे' 3 खेळाडू, मुंबई इंडियन्समधील दोघांचा समावेश

IPL 2025 : 23 मार्च रोजी आयपीएलमधील सर्वदत मोठी रायव्हलरी असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये सामना होईल. मात्र मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यातून त्यांचे 2 स्टार खेळाडू बाहेर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

पुजा पवार | Updated: Mar 12, 2025, 05:00 PM IST
IPL 2025 च्या सुरुवातीच्या मॅचमधून बाहेर राहणार 'हे' 3 खेळाडू, मुंबई इंडियन्समधील दोघांचा समावेश
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Latest News in Marathi : न्यूझीलंडला फायनलमध्ये हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया आता भारतात परतली आहे. 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू आता आपापल्या आयपीएल संघांच्या सराव सेशनमध्ये सामील होत आहेत. आयपीएल 2025 चा (IPL 2025) उदघाटन सामना हा कोलकाता नाईट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. त्यानंतर 23 मार्च रोजी आयपीएलमधील सर्वदत मोठी रायव्हलरी असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोन संघांमध्ये सामना होईल. मात्र मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पहिल्या सामन्यातून त्यांचे 2 स्टार खेळाडू बाहेर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. 

हार्दिक पंड्यावर लागला बॅन : 

आयपीएल 2024 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपरजाएंट्स यांच्यात झालेल्या मुंबईच्या संघांवर तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळल्यास पहिल्यांदा 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा 24 लाखांचा दंड आणि तिसऱ्यांदा सर्व खेळाडूंवर दंड आणि कर्णधारावर एक सामान्याचा बॅन लावण्यात येतो. लखनऊ विरुद्धचा सामना हा मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2024 च्या  सीजनमधील शेवटचा सामना ठरला. त्यामुळे आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यातून हार्दिक पंड्याला बाहेर रहावं लागणार आहे.  त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स सामन्यात खेळताना दिसणार नाही. 

हेही वाचा : कोणाला मिळो न मिळो, Team India ला मिळालीये उन्हाळी सुट्टी; आता भेट थेट 3 महिन्यांनी...

 

जसप्रीत बुमराह : 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान दुखापतग्रस्त झालेला जसप्रीत बुमराह काही महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. याच कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. मात्र आता चांगली बातमी अशी की बुमराहने गोलंदाजीला पुन्हा सुरुवात केली असून तो बंगळुरूच्या रिहॅब सेंटरमध्ये सराव करत आहे. परंतू तरीही बुमराह पूर्णपणे फिट आहे असं सांगता येणार नाही. त्यामुळे आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे काही शिल्लक असल्याने बुमराह आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार एप्रिल पासून बुमराह आयपीएल सामने खेळण्यासाठी मैदानात उतरेल. 

मयंक यादव : 

वेगवान गोलंदाज मयंक यादव याने आयपीएल 2024 मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. 150 हुन अधिक वेगाने गोलंदाजी केलेल्या मयंक अग्रवाल याने आयपीएलच्या डेब्यू सामन्यातच प्लेयर ऑफ द मॅचचा खिताब जिंकला होता. लागोपाठ दोन सामन्यांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली परंतु फिटनेसच्या समस्येमुळे तो आयपीएलचे केवळ 4 सामनेच खेळू शकला. त्यानंतर बांगलादेश विरुद्ध टी 20 सामन्यात सुद्धा मयंकला डेब्यूची संधी मिळाली. मयंक यादव हा लखनऊ सुपरजाएंट्स कडून खेळतो. परंतु आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना त्याच्या सध्याच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतेही अपडेट बीसीसीआयकडून समोर आलेली नाही. क्रिकइंफोच्या रिपोर्ट्सनुसार मयंकला स्ट्रेस संबंधित समस्या आहे. याकारणामुळे मयंक यादव हा आयपीएल 2025 सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर राहू शकतो.