ED ची मोठी कारवाई ! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; जाणून घ्या प्रकरण

ED Action on Suresh Raina and Shikhar Dhawan:  माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेटिंग अॅप प्रकरणाशी संबंधित त्यांच्या 11.14 कोटी किमतीची मालमत्ता जप्त केली.  

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 6, 2025, 05:35 PM IST
ED ची मोठी कारवाई ! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; जाणून घ्या प्रकरण
ED Seizes Assets of Suresh Raina and Shikhar Dhawan know why

Illegal Betting App Case Suresh Raina and Shikhar Dhawan: ऑनलाइन बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप प्रकरणात भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे म्हणजे  माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी प्रवर्तन संचलनालयाने (ED) मोठी कारवाई करत दोघांची मिळून 11.14 कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, 1xBet या अवैध ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने धनशोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत ही जप्ती केली आहे. यात शिखर धवनची अंदाजे 4.5 कोटींची स्थावर मालमत्ता आणि सुरेश रैनाच्या सुमारे 6.64 कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source

काय आहे प्रकरण?

या बेटिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले, आणि त्यामार्फत धनशोधन झाल्याचा संशय ईडीला आहे. चौकशीदरम्यान असे समोर आले की, या अ‍ॅपने भारतातील लाखो लोकांना आकर्षित करून मोठी आर्थिक फसवणूक केली. अनेक गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये बुडाल्याचा आरोप आहे.

ईडीने या प्रकरणात अलीकडेच सुरेश रैना आणि शिखर धवन यांचे जबाब नोंदवले होते. त्या आधारे तपास अधिक गतीमान झाला आहे. एजन्सीच्या मते, अशा अ‍ॅप्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात करचोरी आणि काळा पैसा फिरवला जातो.

इतर सेलिब्रिटीही रडारवर

या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे काही नामांकित क्रिकेटर, मॉडेल्स, कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स यांचीही नावे यात समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने या केसच्या संदर्भात आधीही युवराज सिंह, रॉबिन उथप्पा, तसेच अभिनेता सोनू सूद, उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती आणि बंगाली अभिनेता अंकुश हाजरा यांच्याही बयानांची नोंद केली आहे.

ईडीचे म्हणणे असे आहे की, या सर्व व्यक्तींनी 1xBet किंवा त्याच्या संबंधित कंपन्यांसोबत प्रमोशनल किंवा एंडोर्समेंट करार केले, ज्यामुळे या अवैध प्लॅटफॉर्मला प्रचार आणि सामाजिक विश्वासार्हता मिळाली.

पुढे काय होणार?

आता पुढील टप्प्यात ईडी या करारांचे स्वरूप, आर्थिक लाभ आणि पैशांच्या व्यवहाराचा प्रवाह याची सखोल तपासणी करेल. जर जाणीवपूर्वक फसवणूक किंवा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाला, तर संबंधितांवर गुन्हेगारी कारवाई, दंड आणि अधिक जप्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More