सचिन तेंडुलकरमुळे नव्हे, तर 'या' खास कारणामुळे शार्दुल ठाकूरने निवडली '10' नंबरची जर्सी!

Happy Birthday Shardul Thakur: भारतीय स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर आज 34 वा बर्थडे साजरा करत आहे. भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 16, 2025, 01:21 PM IST
सचिन तेंडुलकरमुळे नव्हे, तर 'या' खास कारणामुळे शार्दुल ठाकूरने निवडली '10' नंबरची जर्सी!
Birthday Special Shardul Thakur Reveals the Real Reason Behind Choosing Jersey No. 10

Why Shardul Thakur Choose Jersey No.10: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर आज केवळ आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीमुळेच नाही, तर आपल्या खास जर्सी नंबरमुळेही चर्चेत असतो. शार्दुलचा जन्म 16 ऑक्टोबर 1991 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झाला. त्याने आपल्या मेहनती आणि जिद्दीच्या जोरावर टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याने जर्सीचा '10' नंबर का निवडला?

Add Zee News as a Preferred Source

का निवडला जर्सीचा '10' नंबर? 

शार्दुलने श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या जर्सीचा ‘10 नंबर’ अधिक चर्चेत राहिला. कारण हा तोच नंबर आहे, जो एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ओळख बनला होता. अनेक चाहत्यांनी तेव्हा असा प्रश्न विचारला की शार्दुलने हा नंबर तेंडुलकरच्या सन्मानार्थ घेतला का?

हे ही वाचा: Shardul Thakur Birthday: एका बिझनेसमॅनच्या मुलीशी मैत्री, नंतर प्रेम अन् लग्न, शार्दुल ठाकूरची प्रेमकहाणी आहे एकदम फिल्मी!

 

का आहे कारण? 

पण शार्दुलने नंतर स्वतः स्पष्ट केले की, त्याने हा नंबर सचिनमुळे नाही, तर अंकशास्त्रामुळे (Numerology) निवडला आहे. त्याच्या मते, त्याचा जन्मदिनांक, महिना आणि वर्ष यातील आकडे मिळून 10 होतात, आणि म्हणून त्याने हा नंबर आपल्या जर्सीसाठी निवडला. त्याला वाटते की हा नंबर त्याच्यासाठी भाग्यशाली (Lucky Number) आहे.

हे ही वाचा: 'हार मानायचं ठरवता तेव्हात तुम्ही...’, निवृत्ती की विश्वचषकाची तयारी? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचताच विराट कोहलीच्या पोस्टने खळबळ

 

काय म्हणाला शार्दूल?

शार्दुल म्हणतो, "माझ्या आयुष्यात अनेक निर्णय मी आत्मविश्वासाने घेतले आहेत, आणि हा नंबर माझ्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे." तो मानतो की हा नंबर त्याला आत्मविश्वास देतो आणि मैदानावर लक्ष केंद्रीत ठेवतो.

सचिनच्या जर्सीचा नंबरही 10 

रोचक बाब म्हणजे, सचिन तेंडुलकरनेही आपल्या जर्सीचा नंबर अंकशास्त्राच्या आधारेच निवडला होता. आपल्या सुरुवातीच्या काळात सचिनने ‘99 नंबर’ आणि नंतर ‘33 नंबर’ची जर्सी घातली होती, पण वर्ल्ड कप 2007 च्या आधी त्याने पुन्हा ‘10 नंबर’ची जर्सी वापरायला सुरुवात केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेईपर्यंत तो हाच नंबर वापरत राहिला.

हे ही वाचा: आलीशान कोठीपासून लग्जरी फ्लॅटपर्यंत...ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने भावाकडे सोपवली 'इतकी' संपत्तीची जबाबदारी!

 

आज शार्दुल ठाकूर टीम इंडियाचा विश्वासार्ह खेळाडू मानला जातो. त्याचा आत्मविश्वास, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनच त्याला ‘टीमचा विश्वासार्ह ऑलराउंडर’ बनवतो  आणि कदाचित ‘10 नंबर’ त्याच्या या प्रवासाचा भाग्यवान साथीदार ठरला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More