Mary Kom and her Husband K Onler Kom Controversy: भारताची ऑलिम्पिक पदक विजेती आणि सहा वेळा विश्वविजेती ठरलेली दिग्गज बॉक्सर म्हणजे मेरी कॉम (Mary Kom). मेरीचं सध्या वैयक्तिक आयुष्य फारच चर्चेत आहे. मेरीचा डिवोर्स झाला असून तेव्हापासून आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहे. मेरी आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी कारण ठरले आहेत तिचा माजी पती करुंग ओन्खोलरने (ओनलर) (K Onler Kom) , मेरी कॉमवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मेरी कॉमने आपल्या माजी पतीवर कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, ओन्खोलरमुळेच तिला मौल्यवान जमीनही गमवावी लागली. मात्र आता ओन्खोलरने हे सर्व आरोप साफ फेटाळून लावत प्रतिआरोपांचा पाढा वाचला आहे.
न्यूज एजन्सी IANS शी बोलताना ओन्खोलरने म्हटले की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. “मेरी कॉमने मालमत्तेचा विषय काढत माझे नाव कागदपत्रांतून काढून टाकण्यास सांगितले. माझ्यावर 5 कोटी रुपये चोरल्याचा आरोप केला जात आहे. माझे बँक खाते तपासून पाहा. 18 वर्षे आम्ही एकत्र संसार केला, आणि आज माझ्याकडे काय आहे? मी सध्या दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहतो.” असे तो म्हणाला.
हे ही वाचा: ‘ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला, त्याच्याकडूनच…’, बॉक्सर मेरी कोमने मौन सोडलं, सांगितले खरे कारण
ओन्खोलरने भावनिक प्रतिक्रिया देत सांगितले की, “मी त्यांना माफ करू शकतो, पण माझ्यासोबत जे वागणूक दिली गेली ते विसरू शकत नाही. माझा फक्त वापर करण्यात आला आणि नंतर मला बाजूला सारण्यात आलं. मेरी कॉम बॉक्सिंग अकादमीची पायाभरणी कोणी केली? रजिस्ट्रेशन कोणी केलं? आज त्या अकादमीचा चेअरमन दुसराच आहे, ज्याचं नाव मी घेणार नाही. या सगळ्यामुळे मला प्रचंड मानसिक वेदना झाल्या आहेत.”
हे ही वाचा: Mary Kom Divorce: मेरी कोमने पतीपासून घेतला घटस्फोट, अफेअरच्या अफवांचे केले खंडन
ओन्खोलरने आणखी खळबळजनक दावा करत म्हटले की, मेरी कॉमचे लग्नात असतानाच इतर व्यक्तींशी संबंध होते. “2013 साली तिचं एका कनिष्ठ बॉक्सरसोबत अफेअर होतं. त्यामुळे आमच्या कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला होता, पण नंतर समेट झाला. मात्र 2017 नंतर मेरी कॉम बॉक्सिंग अकादमीतीलच एका व्यक्तीसोबत तिचे संबंध सुरू होते,” असा आरोप त्याने केला. आपले दवे खरे आहे आणि त्याची पुष्टी करण्यासाठी त्याच्याकडे पुरावे असल्याचेही ओन्खोलरने सांगितले. “त्या काळातील व्हॉट्सअॅप मेसेजेस माझ्याकडे आहेत. त्या व्यक्तीचं नावही मला माहीत आहे, पण मी आतापर्यंत शांत राहिलो,” असे तो म्हणाला.
हे ही वाचा: विवाहबाह्य संबंधांमुळे ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमचा घटस्फोट? फुटबॉलपटू पती 2022 पासून...
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मेरी कॉम आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावरील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
UAE
|
VS |
NEP
|
| Nepal beat United Arab Emirates by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
|
VS |
NED
|
| Zimbabwe beat Netherlands by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL-A
|
VS |
OMA
|
| Oman beat Sri Lanka A by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.