Saweety Boora and Deepak Hooda: भारतीय महिला बॉक्सर स्वीटी बुरा आणि तिचा पती, भारतीय पुरुष कबड्डी संघाचा खेळाडू दीपक हुडा यांच्यात सर्वकाही आलबेल नाहीये. नुकताच या दोघानामधील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांमधील भांडणाचा व्हिडीओ पोलिस ठाण्यातील आहे. व्हिडीओ दिसणारी घटना 15 मार्च रोजी घडली असून त्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. व्हिडीओमध्ये स्वीटी दीपकचा गळा आवळून त्याला मारहाण करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या आधारे हिसार पोलिसांनी स्वीटीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वीटी आणि दीपकचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही वेळाने स्विटीने दीपकवर हुंड्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. तिने सांगितले की, लग्नात एक कोटी रुपये आणि फॉर्च्युनर देऊनही दीपक तिला हुंड्यासाठी नेहमीच त्रास देत होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, हिसार जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात स्वीटी आणि दीपक इतर लोकांसोबत बसले आहेत. तेव्हा स्वीटी आणि दीपक या दोघात कडाक्याचे भांडण होते. काही वेळातच अचानक स्वीटी खुर्चीवरून उठते आणि दीपकचा गळा दाबण्यास सुरुवात करते. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या कुटुंबीय या भांडणात हस्तक्षेप करायला सुरुवात करतात. व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की स्वीटी खूपच आक्रमक झाली होती. आजूबाजूचे लोक तिला शांत करत दीपकला स्वीटीच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते. पण स्वीटी दीपकशी मोठ्याने भांडताना दिसली.
HISAR : बॉक्सर स्वीटी बूरा का पति से मारपीट का VIDEO
पुलिस थाने में कुर्सी से उठी स्वीटी बूरा दीपक हुड्डा का गला दबाया
पकड़कर झिंझोड़ती-चिल्लाती रही pic.twitter.com/RhDFuHjqQs
— Amandeep Pillania (@APillania) March 24, 2025
हे ही वाचा: तमीम इकबालचा ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक Video Viral, सामन्यादरम्यान मैदानात आला होता हृदयविकाराचा झटका
यापूर्वी 23 मार्च रोजी स्वीटीने पत्रकार परिषदेत पोलिस ठाण्यात कोणतीही भांडणे झाली नसल्याचे सांगितले होते. पण आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जे सत्य आहे ते दिसून येत आहे. दरम्यान, दीपक हुड्डा यांनी स्वीटी आणि तिच्या कुटुंबियांवर मालमत्ता हडप केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे.
हे ही वाचा: इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर
दीपकने सांगितले की, 'स्वीटीने झोपेत असताना त्याचे डोके फोडले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केला.' दीपकने संगीतलेल्या या गोष्टीमुळे दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढला आहे. दीपकने 16 मार्च रोजी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर स्वीटी, तिचे वडील आणि मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.