ब्रेविसने चित्त्यासारखी उडी मारुन घेतलेल्या उडत्या कॅचने वेधलं लक्ष, कोहलीचे डोळेसुद्धा विस्फारले

IND VS SA : रांची स्टोडियमवरील Ind vs SA  सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू देवाल्ड ब्रेव्हिसने ऋतुराज गायकवाडचा एका हाताने जबरदस्त कॅच घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वतः विराट कोहली देखील या कॅचकडे थक्क होऊन पाहत राहिला.  

Updated: Dec 1, 2025, 12:38 PM IST
ब्रेविसने चित्त्यासारखी उडी मारुन घेतलेल्या उडत्या कॅचने वेधलं लक्ष, कोहलीचे डोळेसुद्धा विस्फारले

IND VS SA : रांची स्टेडियमवर रविवार 30 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना खेळवला गेला. दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू देवाल्ड ब्रेव्हिसने ऋतुराज गायकवाडचा एका हाताने जबरदस्त कॅच घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वतः विराट कोहली देखील या कॅचकडे थक्क होऊन पाहत राहिला.

Add Zee News as a Preferred Source

भारत आणि दक्षिण आफ्रिका सीरीझमधील पहिला चुरशीचा एकदिवसीय सामना रांची येथे खेळला गेला. विराट कोहलीने त्याच्या शतकाने धुमाकूळ घातला. त्याच्या शतकापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा तरुण क्रिकेटपटू देवाल्ड ब्रेव्हिसने रुतुराज गायकवाडच्या डावाचा एका हाताने जबरदस्त झेल घेऊन चाहत्यांकडून आणि दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळवली. ब्रेव्हिसच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा झेल इतका प्रभावी होता की विराट कोहली देखील स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकला नाही.

ब्रेव्हिसचा हा झेल तुम्ही पाहिला का?
खरंतर, ब्रेव्हिसने हा झेल डावाच्या 27 व्या ओव्हरमध्ये घेतला, जेव्हा रुतुराजला तिसऱ्या बॉलवर पवेलियन जावे लागले. या डावादरम्यान ओथनिएल बार्टमनने ऑफ-स्टंपच्या बाहेर सरळ गुड-लेंथ बॉल टाकला. हा बॉल गायकवाडने जोरदार मारला. रुतुराजचा शॉट बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या ब्रेव्हिसच्या उजवीकडे होता. सावध उभे असलेल्या ब्रेव्हिसने चपळता दाखवली, हवेत उडी मारली, एका हाताने त्याने तडाखेबाज कॅच घेतला.  दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण, रुतुराजला विश्वासच बसत नव्हता की त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागत आहे. नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या कोहलीने ब्रेव्हिसने एक उल्लेखनीय झेल घेतल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.

ब्रेव्हिसने फक्त विकेट घेण्यात नाही तर फलंदाजीतही चमक दाखवली. दक्षिण आफ्रिकेची संथ खेळीनंतर, ब्रेव्हिस सहाव्या क्रमांकावर आला आणि त्याने नाबाद 37 धावा केल्या. या काळात त्याने काही प्रभावी शॉट मारले. त्याने तीन सिक्सर आणि दोन चौकार मारले. दरम्यान हर्षित राणाच्या एका बॉलमध्ये त्याचा डाव संपुष्टात आला. तो झेलबाद झाला.

रुतुराजचं दोन वर्षांनंतर पुनरागमन 
रुतुराज गायकवाडने जवळजवळ दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतासाठी एकदिवसीय सामन्यात पुनरागमन केले. पण, त्याच्या बॅटने हवी तशी कामगिरी केली नाही. IPL संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार  असलेल्या रुतुराजने सामन्यात 14 बॉलमध्ये एकही चौकार न मारता फक्त 8 धावा केल्या. इंडिया अ संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तो अलीकडेच एकदिवसीय संघात परतला होता. आता उरलेल्या दोन सामन्यांमध्ये रुतुराजकडून संघाला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

 

About the Author