चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी टीम इंडियासाठी गुडन्यूज, 'ही' पनवती झाली दूर, आयसीसीकडून घोषणा

Champions Trophy 2025 :  9 मार्च रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यासाठी अंपायरची घोषणा करण्यात आली आहे. 

पूजा पवार | Updated: Mar 7, 2025, 01:28 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी टीम इंडियासाठी गुडन्यूज, 'ही' पनवती झाली दूर, आयसीसीकडून घोषणा
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) फायनल सामना हा भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात पार पडणार आहे. 9 मार्च रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यासाठी अंपायरची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॉल रीफेल आणि इंग्लंडचा रिचर्ड इलिंगवर्थ हे भारत - न्यूझीलंड फायनल सामन्यात मैदानातील अंपायर असतील तर श्रीलंकेचा रंजन मदुगले हा मॅच रेफरी असेल. 

Add Zee News as a Preferred Source

कुमार धर्मसेना असणार फायनलचा भाग : 

58 वर्षीय ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज रीफेल लाहौर हा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा यांच्यातील सेमी फायनल सामन्यातही मैदानातील अंपायर होता. तर वेस्ट इंडिजचा जोएल विल्सन हा फायनल सामन्यात थर्ड अंपायरची भूमिका निभावेल. श्रीलंकेचा कुमार धर्मसेना फायनल सामन्यात चौथा अंपायर असेल. धर्मसेना हा एकमेव क्रिकेट आहे जो अंपायर आणि खेळाडू म्हणून वर्ल्ड कपच्या फायनल सामन्याचा भाग राहिलेला आहे. 

मॅच ऑफिसियल्सची यादी : 

मैदानी अंपायर - पॉल रीफेल आणि रिचर्ड इलिंगवर्थ
थर्ड अंपायर - जोएल विल्सन
चौथा अंपायर - कुमार धर्मसेना
मॅच रेफरी - रंजन मदुगले

हेही वाचा : न्यूझीलंडकडून 25 वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी उतरणार भारत, 3 वेळा चॅम्पियन होण्यापासून रोखलं

 

अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ भारतासाठी लकी : 

इंग्लंडचा माजी गोलंदाज 61 वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ हा दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये अंपायर होता. तब्बल 4 वेळा आयसीसी अंपायर ऑफ द ईयर पुरस्कार मिळवणारा इलिंगवर्थ भारताच्या 2023 वनडे वर्ल्ड कप आणि अमेरिकामध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड को 2024 च्या फायनलमध्ये सुद्धा अंपायर राहिले आहे. तो ग्रुप स्टेज भारत - न्यूझीलंड सामन्यात सुद्धा अंपायर होता ज्यात भारताने न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला होता. 

रिचर्ड केटलब्रो पासून मिळाली सुटका : 

अंपायर रिचर्ड केटलब्रो हा आयसीसी नॉकआउट सामन्यात जेव्हा जेव्हा मैदानावर असतो तेव्हा भारतीय संघ त्या सामन्यात चांगलं परफॉर्म करत नाही. अंपायर रिचर्ड केटलब्रो हा 2014 टी20 वर्ल्ड कप फायनल, 2015 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2016 टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल आणि 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये सुद्धा मैदानातील अंपायर होता. या सर्व नॉक आउट सामन्यात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे अंपायर रिचर्ड केटलब्रो याला टीम इंडियासाठी अनलकी अंपायर समजले जायचे.  2024 टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये तो मैदानातील अंपायर नव्हता तेव्हा टीम इंडियाचा विजय झाला आणि अनेक वर्षांनी भारताने विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये सुद्धा रिचर्ड केटलब्रो दिसणार नाही. 

About the Author