Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पोहोचणारे 4 संघ आता निश्चित झाले आहेत. ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांनी यापूर्वीच सेमी फायनलमध्ये स्थान मिळवलं होतं. तर ग्रुप बी मधून 4 पॉईंट्स घेऊन ऑस्ट्रेलियाने सुद्धा सेमी फायनल गाठलं होतं. तर शनिवारी साऊथ आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध 7 विकेट्स राखून विजय मिळवून सेमी फायनलमध्ये दणक्यात एंट्री घेतली. त्यामुळे सेमी फायनलमध्ये पोहोचणारे 4 संघ निश्चित झाले असून यांच्यात 4 आणि 5 मार्च रोजी सामना पार पडेल.
4 मार्च रोजी होणारा सेमी फायनल सामना हा दुबईत खेळवला जाणार आहे. तर 5 मार्च रोजी होणारा सामना हा पाकिस्तानात खेळवला जाईल. टीम इंडियाचा सेमी फायनल सामना हा 4 मार्च रोजी होईल. मात्र यात भारत कोणत्या संघाशी भिडणार हे रविवारी होणाऱ्या भारत - न्यूझीलंड या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यानंतर ठरेल. ग्रुप बीमध्ये 5 पॉईंट्सने साऊथ आफ्रिका टॉपवर आहे, तर ऑस्ट्रेलिया 4 पॉईंट्स मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ग्रुप ए मध्ये सध्या भारत अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहे. परंतु रविवारी होणाऱ्या सामन्याच्या निर्णयानंतर ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये बदल होऊ शकेल. त्यामुळे या सामन्यानंतरच भारत सेमी फायनल ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार की साऊथ आफ्रिके विरुद्ध हे निश्चित होईल.
हेही वाचा : IND VS NZ : शमी ऐवजी 'या' गोलंदाजाला संधी, रोहितच्या खेळण्यावर शंका, अशी असेल भारताची प्लेईंग 11
नियमांनुसार सेमी फायनलच्या ग्रुप ए मध्ये टॉपर संघ हा ग्रुप बी च्या क्रमांक दोनवर असलेल्या संघासोबत खेळेल. तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ग्रुप बीमध्ये टॉपवर असणारा संघ हा सेमी फायनल सामना ग्रुप ए मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाविरुद्ध खेळेल.
रविवारी होणाऱ्या सामन्यात जर भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला तर सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना हा ऑस्ट्रेलियाशी होईल. कारण विजयासह टीम इंडिया ग्रुप ए मध्ये टॉपवर असेल.
रविवारी होणाऱ्या सामन्यात जर न्यूझीलंडने भारताचा पराभव केला तर सेमी फायनलमध्ये भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात सामना होईल. कारण भारतावर विजय मिळवल्याने न्यूझीलंड ग्रुप ए मध्ये टॉपवर असेल आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.