'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असून, संघाच्या या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच... 

सायली पाटील | Updated: Mar 3, 2025, 01:05 PM IST
'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!
champions trophy 2025 Rohit Sharma is fat for a sportsman congress and bjp leader clash over social media post

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्मानं त्याला मिळालेल्या कैक संधींचं सोनं करत संघाला एका समाधानकारक उंचीवर नेऊन ठेवलं. कर्णधार आणि खेळाडू अशा दुहेरी भूमिका त्यानं लिलया पेलल्या. असा हा रोहित, सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचं नेतृत्वं करत असून, त्याची आणि संघाची कामगिरी पाहता Team India या स्पर्धेत विजेतेबदाची प्रबध दावेदार समजली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

एकिकडे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वाचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र त्याच्या नावाची चर्चा काहीशा अनपेक्षित कारणांसाठी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यास कारण ठरतेय ती म्हणजे काँग्रेस नेत्या, प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितविषयी केलेली एक वादग्रस्त पोस्ट. 

शमा मोहम्मद यांनी X पोस्ट करत, 'एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जरा जाडजूड आहे त्याला वजन कमी करायची गरज आहे. सहाजिकच भारतीय क्रिकेट संघाचा तो आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे' असं म्हटलं. या पोस्टनंतर सोशल मीडियावर एक वादंग माजलं. शमा मोहम्मद यांनी वाढता रोष पाहता तातडीनं आपली पोस्ट डिलीटही केली. पण, तरीही त्यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट मात्र आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर पोस्टची दखल भाजपनंही 
घेतली असून, BJP नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दिक तोफ डागली. खेडा यांनी काँग्रेसवर सातत्यानं, दशकानुदशकं खेळाडूंना अपमानित करण्याचा गंभीर आरोपही लावला. 

काँग्रेसच्या या नेत्यांना सणसणीत उत्तर देत खेडा यांनी पोस्ट केली, की 'हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यानं दशकानुदशकं खेळाडूंना अपमानित केलं. त्यांना मान्यता नाकारली आणि आता क्रिकेच विश्वातील एका दिग्गजाचीही ते खिल्ली उडवण्याचं धाडस करत आहेत'.

राहुल गांधी यांचं नाव घेत रोहित शर्मानं तर भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिलं आहे. इथं राहुल गांधी यांना त्यांचा कोलमहणारा पक्षही वाचवू शकत नाही. असं म्हणत काँग्रेसचं पक्ष म्हणून कमी होणारं वजन आणि अपयश याकडे पक्षाच्या प्रवक्त्यांनी लक्ष द्यावं अशा शब्दांत खेडा यांनी काँग्रेस प्रवत्क्यांना निशाण्यावर घेतलं. 

champions trophy 2025 Rohit Sharma is fat for a sportsman congress and bjp leader clash over social media post

दरम्यान, आपल्या पोस्टमुळं झालेला वाद पाहता शमा मोहम्मद यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपली पोस्ट म्हणजे एका खेळाडूच्या शारीरिक सुदृढतेविषयी केलेलं वक्तव्य होतं, हे बॉडी शेमिंगचं उदाहरण नव्हतं असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More