टीम इंडियाची सेमी फायनल मॅच कोणासोबत होणार? ऑस्ट्रेलिया की साऊथ आफ्रिका; पाहा समीकरण

Champions Trophy 2025 : शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने कहर केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ चार पॉईंट्स सह सेमी फायनलमध्ये पोहोचणारा ग्रुप बी मधील पहिला संघ ठरला आहे. 

पूजा पवार | Updated: Mar 1, 2025, 10:32 AM IST
टीम इंडियाची सेमी फायनल मॅच कोणासोबत होणार? ऑस्ट्रेलिया की साऊथ आफ्रिका; पाहा समीकरण
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा जस जशी शेवटाकडे वाटचाल करू लागलीये तस तशी ती अधिक रोमांचक होऊ लागली आहे. ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड (India VS New Zealand) हे दोन संघ सेमी फायनलसाठी क्वालिफाय झालेत. तर शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने कहर केल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ चार पॉईंट्स सह सेमी फायनलमध्ये पोहोचणारा ग्रुप बी मधील पहिला संघ ठरला आहे. तर ग्रुप बी मधून दुसऱ्या क्रमांकावर कोणता संघ सेमी फायनलमध्ये क्वालिफाय करेल हे शनिवारी साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa VS England) सामन्यानंतर स्पष्ट होईल. तेव्हा सेमी फायनलचं समीकरण कसं असेल टीम इंडिया (Team India) कोणासोबत नॉक आऊट सामना खेळेल याविषयी जाणून घेऊयात. 

Add Zee News as a Preferred Source

भारताचा सेमी फायनल सामना कोणाशी? 

ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता भारताचा सेमीफायनल सामना कोणाशी होईल हे 2 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. समजा तर टीम इंडियाने 2 मार्च रोजी न्यूझीलंडला हरवले तर ते ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये प्रथम स्थानी असतील. असं झाल्यास भारताचा सेमी फायनल मुकाबला हा ग्रुप बीच्या पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाशी होईल. भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर ते सेमी फायनल सामना हा ग्रुप बी च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळतील. 

हेही वाचा : Fact Check : अफगाणिस्तानच्या मुस्लिम खेळाडूने महाशिवरात्रिच्या दिवशी शतक ठोकून वाजवला डमरू? जाणून घ्या Video चं सत्य

 

ग्रुप बीचं पॉईंट्स टेबल अजून निश्चित झालेलं नाही. शनिवारी साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर ते निश्चित होईल. जर साऊथ आफ्रिकेचा संघ आज सामना जिंकला तर तो पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर येईल. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर येईल. याप्रकारे जर टीम इंडिया ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावर राहिली तर त्यांचा सामना सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया सोबत होईल. तसेच जर भारत दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर ते साऊथ आफ्रिके विरुद्ध सेमी फायनल सामना खेळतील. 

भारताने आतापर्यंत सर्व सामने जिंकले : 

प्रत्येक संघाला ग्रुप स्टेजचे तीन सामने खेळावे लागणार आहेत. आतापर्यंत भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सामना खेळून दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. बांगलादेश विरुद्ध पहिल्या सामन्यात भारताने त्यांचा 60 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तान विरुद्ध भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतकीय कामगिरी केली. तर बांग्लादेश विरुद्ध उपकर्णधार शुभमन गिलने देखील फलंदाजी करताना शतक ठोकले. 

 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More