मुंबई: जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. भारतात कोरोनाचं थैमान सुरू आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या संसर्गाचा फटका IPLला बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे IPLमध्ये कोरोनानं शिरकाव केला.  कोरोना काळात आयपीएल खेळवली जात असल्यानं आणि या IPLमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता लीग रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दिल्ली हायकोर्टात आयपीएल 2021 रद्द करण्याची मागणी करणारी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच कोलकाता संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी होणारा बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला. तो सामना रिशेड्युल करण्यात येणार आहे. दुसरीकडे चेन्नई संघाचे बॉलिंग कोच, सीईओ आणि स्टाफमधी एक जण बस क्लिनर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. 


दिल्लीतील वकील आणि सामाजिक कार्यकर्ते करण सिंह ठकराल यांनी ही याचिका दाखल केली आहे. ठकराल यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते सध्या उपचार घेत असून त्यांनी IPL रद्द करण्याची मागणी केली आहे. 


दिल्लीतील वैद्यकीय सुविधेची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे त्यांनी वकिलामार्फत आपली याचिका दाखल केली आहे. जनतेच्या आरोग्यापेक्षा आयपीएलला कसे प्राधान्य दिले जाते या संदर्भात चौकशीचे आदेश द्यावेत, असं हायकोर्टात अपील केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. उर्वरित सामने तातडीने रद्द करण्यात यावेत असंही या याचिकेमध्ये म्हटलं आहे.


बीसीसीआय आणि DDCA तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय स्टेडियमचा उपयोग कोरोनाग्रस्तांसाठी करण्यात यावा अशीही विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणी 5 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दिल्ली हायकोर्टा याबाबत कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.